वॉशिंग्टन, दि. 19 - असहिष्णुता आणि वाढती बेकारी हीच भारतासमोरील प्रमुख आव्हाने आहेत यामुळेच भारताची सुरक्षा आणि विकास प्रक्रीया अडचणीत आली असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. ते सध्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एकूण जगभरातच सध्याच्या काळात सहिष्णुता धोक्यात आली आहे. मात्र भारतातील असहिष्णुतेचे प्रमाण अधिक गंभीर आहे. त्याचप्रमाणे देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या तरुणाईच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे देश भयानक विघातक दिशेने वाटचाल करीत आहे; अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली.
( आणखी वाचा -नापास नेत्यांची विदेशात लेक्चरबाजी - अमित शाहंची राहुल गांधींवर बोचरी टीका )
डेमोक्रॅटिक पक्षाचा थिंक टॅंक समजल्या जाणाऱ्या सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसने आयोजित केलेल्या अमेरिका स्थित भारतीय, दक्षिण आशियाई तज्ञांबरोबरच्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते.
( आणखी वाचा - बकवास करु नका ! जबरदस्ती आणि गुंडगिरी करुन लोकांचं प्रेम मिळवता येत नाही, राहुल गांधींवर भडकले ऋषी कपूर )
राहुल गांधींच्या भाषणानंतर उपस्थित त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाल्याचा दावा काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केला. राहुल यांची जी प्रतीमा आमच्या मनात होती; प्रत्यक्षात ते अतिशय वेगळे आहेत. ते तर्कशुद्ध विचार करणारे, अभ्यासू आहेत. त्यांना समस्यांची जाण आहे; असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते, राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची स्तुतीपंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यापेक्षा उत्तम प्रवक्ते आहेत अशी कबुली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यापेक्षा चांगले प्रवक्ते असल्याचं मान्य केलं. मात्र स्तुती करण्याच्या बहाण्याने त्यांनी मोदींवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. 'पंतप्रधान मोदींकडे काही कौशल्य आहेत. नरेंद्र मोदी माझ्यापेक्षाही उत्तम प्रवक्ते आहेत', असं राहुल गांधी सुरुवातीला बोलले. 'गर्दीतील तीन ते चार वेगवेगळ्या गटांपर्यंत आपला संदेश कसा पोहोचवायचा हे मोदींना चांगलंच माहिती आहे. आपला संदेश पोहोचवण्याची त्यांची क्षमता प्रभावी आणि जटिल आहे', असं राहुल गांधी बोलले. नंतर पुढे बोलताना त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली.