नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने ब्रिटनमधील प्रतिष्ठित ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र (Philosophy, Politics and Economics) या विषयात पदवी मिळविली आहे. मलाला युसूफझाई ऑक्सफोर्डच्या लेडी मार्गारेट हॉल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तिने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबासमवेत एक मोठा कार्यक्रम साजरा केला आणि आपल्या भविष्यात काय करायचे आहे, यासंदर्भात खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर दोन फोटो शेअर करताना मलाला युसूफझाईने लिहिले आहे की, "मी ऑक्सफोर्डमधून मी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. याबद्दल मला खूप आनंद झाला आहे." याशिवाय, फोटोत ती आपल्या कुटुंबीयांसोबत पदवी मिळाल्याचा आनंद सेलिब्रेटी करताना दिसत आहे. तिने आपल्या कुटुंबासमवेत केक कापला. केकमध्ये लिहिले आहे, 'हॅपी ग्रॅज्युएशन मलाला.' दुसर्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर भरपूर केक लावला आहे आणि ती हसत आहे.
याचबरोबर, मलाला युसूफझाई हिने आपल्या भविष्यातील नियोजन कसे असेल यासंदर्भात सांगितले. यावेळी ती म्हणाली, "पुढे काय आहे हे मला माहिती नाही. आत्तासाठी नेटफ्लिक्स, वाचन आणि झोप हे असणार आहे." दरम्यान, मलाला युसूफझाई हिच्या सोशल मीडियातील या पोस्टला आतापर्यंत 1.2 लाख लाईक्स मिळाले आहेत. तर 15 हजार वेळा रिट्वीट करण्यात आले आहे. पदवी प्राप्त झाल्याबद्दल 2 हजाराहून अधिक लोकांनी तिचे अभिनंदन केले आहे.
मलाला युसूफझाई हिने मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत जगभरात ख्याती मिळविली आहे. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात मलाला युसूफझाई हिने मुलींना शिक्षण मिळण्यासाठी काम केले आहे. शिवाय, तालिबान्यांविरुद्ध बीबीसी उर्दू ब्लॉगवर लिहिले होते. त्यानंतर तिच्या डोक्यात तालिबान्यांनी गोळ्या घातल्या होत्या. 2014 मध्ये मलाला युसूफझाई हिला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. तसेच, मलाला युसूफझाई हिने ‘आय एम मलाला : द गर्ल हू स्टुड अप फॉर एज्युकेशन अँड वॉज शॉट बाय द तालिबान’ हे आठवणींचे पुस्तक ख्रिस्तिना लँब यांच्यासह लिहिले आहे.
आणखी बातम्या...
आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'
Encounters In Jammu & Kashmir: सुरक्षा दलांना मोठं यश, जम्मू-काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान
देमचोक, पेंगाँग भागातील गावे खाली करण्याचे लष्काराचे आदेश, सूत्रांची माहिती
कॉल आला अन् सांगितले, "तुम्ही अमनचे वडील आहात? तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला"