शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

६१ वर्षांची वधू, २४ वर्षांचा वर; आजीबाईच्या लग्नात २५ लाख ‘वऱ्हाडी’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 8:17 AM

प्रेमात पागल झालेले अनेक दीवाने आजवर तुम्ही पाहिले असतील.. प्रेम कुणावर करावं, कधी करावं, कोणत्या वयात करावं, याचं काहीही बंधन या प्रेमवीरांवर नसतं. उपदेशाच्या डोसांची कोणतीही मात्रा कधीच त्यांच्यावर चालत नाही, हेही खरं. 

जॉर्जियामधील या प्रेमी युगुलाकडेच पाहा ना.. त्यांच्या घरच्यांनीच त्यांना उपदेशाचे किती डोस पाजले, किती समजावून सांगितलं, समाजात आपली छी..थू होईल म्हणून असं काही करू नका, असंही पदोपदी विनवलं, पण या जोडप्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. डंके की चोटपर त्यांनी लग्न केलंच आणि सोशल मीडियावर त्याची जंगी ‘मिरवणूक’ही काढली. या जोडप्याच्या किस्स्यांनी आता सोशल मीडिया भरभरून वाहतं आहे.

कोण आहे हे जोडपं? आणि जगभरात का होते आहे या जोडप्याची चर्चा?.. या जोडप्यातील नवऱ्याचं नाव आहे कुरेन मॅकेन. त्याचं वय आहे २४ वर्षे आणि नवरीचं नाव आहे शेरील मॅकग्रेगोर. तिचं वय आहे ६१ वर्षे. या दोघांच्या वयात तब्बल ३७ वर्षांचं अंतर आहे. शेरील आजीला तर तब्बल १७ नातवंडं आहेत. या नातवंडांनीही आजीचं मन वळवून पाहिलं, तिला आपल्या प्रेमाच्या शपथा घातल्या, पण आजी कसली ऐकायला तयार? २४ वर्षीय कुरेनवर तिचं इतकं प्रेम जडलं होतं, की पाच मिनिटांसाठीही त्याचा विरह तिला सहन होत नव्हता. तिकडे कुरेनचीही तीच स्थिती होती. 

खरं तर या दोघांची पहिली भेट खूप पूर्वीच म्हणजे २०१२ सालीच झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांची नजरानजर झाली आणि दोघांच्याही हृदयाची तार छेडली गेली. त्यावेळी कुरेन केवळ १५ वर्षांचा होता. शेरील आजीचा मुलगा क्रिस यांच्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये कुरेन त्यावेळी काम करीत होता. पण या पहिल्या भेटीनंतर बराच काळ त्यांचा संपर्क तुटला आणि प्रेमाचं हे नातं बहरू शकलं नाही. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी, म्हणजे ४ नोव्हेंबर २०२० रोजी पुन्हा एकदा या दोघांची भेट झाली आणि त्यांच्यातील प्रेमाच्या या नात्याला मग कोणीच बांध घालू शकलं नाही. सुमारे वर्षभर त्यांनी एकमेकांना डेटही केलं. 

कुरेनवरील आपलं प्रेम कसं व्यक्त करावं, त्याला कसं सांगावं, या चिंतेत आधी शेरील आजीबाई होत्या, पण कुरेननंच आजीला प्रपोज केल्यावर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. आश्चर्याच्या या धक्क्यातून बरेच दिवस ती बाहेरही आली नाही. समाजाला, विशेषत: कुरेनच्या पालकांना आणि त्यातही शेरील आजीच्या मुलांना, नातवंडांना, तिच्या नातेवाइकांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा या लग्नापासून शेरील आजीला परावृत्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केला, तिच्या सातही मुलांनी या लग्नाला विरोध केला, पण आजी बधली नाही ती नाहीच. 

शेरील आजी म्हणते, आमच्या लग्नाची गाठ स्वर्गातच बांधली गेली होती, नियतीनंच जर आमची जोडी जमवायची ठरवलेलं आहे, तर त्यात आडकाठी आणणारे तुम्ही कोण?.. अर्थातच आजीबाईंच्या या हट्टापुढे साऱ्यांचाच विरोध फिका पडला आणि दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलंच. टिकटॉकवर त्यांनी आपल्या लग्नाचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. या लग्नाला तब्बल २५ लाख लोक ऑनलाइन हजर होते! 

कुरेन म्हणतो, मी शेरीलशी लग्न केलं, ते उगाच नाही. तिच्या वयावर जाऊ नका. ती अजूनही अतिशय देखणी आहे. याशिवाय ती सर्वार्थानं स्ट्राँग आहे, मोहक आहे, अतिशय प्रेमळ आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या नात्याशी ती अतिशय प्रामाणिक आहे. मला बायको म्हणून जशी मुलगी हवी होती, अगदी तश्शी, माझ्या मनासारखी मुलगी मला मिळाली. मी अतिशय खूष आहे.

नवरा-नवरीच्या घरात सजतोय पाळणा!कुरेन आणि शेरील आजीच्या लग्नाची ही कहाणी इथेच संपलेली नाही. या दोघांनाही आता अतिशय गोंडस अशा अपत्याची प्रतीक्षा आहे. शेरील आजी सांगते, मला स्वत:लाच परत प्रत्यक्ष आई होण्याची इच्छा आहे, पण माझ्या वयामुळे ते आता शक्य नाही, पण सरोगसीनं बाळ जन्माला घालायचे किंवा मूल दत्तक घ्यायचे आमचा विचार आहे. त्यासाठी वाट्टेल तेवढा खर्च करायचीही त्यांची तयारी आहे. बाळाच्या आगमनाची तयारीही त्यांनी आत्तापासूनच सुरू केली आहे. त्यासाठीच्या आवश्यक गोष्टींची खरेदी सुरू झाली आहे. बाळाची रूम रंगबिरंगी रंगांनी आणि खेळण्यांनी सजवली जाते आहे..

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयmarriageलग्न