कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका रात्रीत अनेकांना श्रीमंत व्हायचं असतं. तशी स्वप्नही कित्येकांना पडतात. असंच काहीस एका व्यक्तीसोबत घडलं आहे. त्याचा अंदाच अचूक ठरला आणि तो मालामाल झाला आहे. कबर खोदणारी एक व्यक्ती एका झटक्यात करोडपती झाली आहे. या गरीब व्यक्तीला तब्बल दोन कोटींची लॉटरी लागली आहे.
विशेष म्हणजे या व्यक्तीने पहिल्यांदाच लॉटरी खेळली होती. त्याने सहज तिकीट काढलं आणि त्याला नंबरांवर एक अंदाज लावला. जो अंदाज त्याला कोट्यधीश करून गेला आहे. ल्यूथर डाउडी (Luthar Dowdy) असं लॉटरी जिंकलेल्या भाग्यवान विजेत्याचे नाव आहे. ते 63 वर्षांचे आहेत. ल्यूथर प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक ड्रायव्हर डेल अर्नहार्टचे चाहते आहेत.
कम्पूटरवरून ऑटोमेटीक निवडलेल्या 'तीन' क्रमांकावर त्यांनी पैज लावली होती. कारण, डेलच्या रेसिंग कारचा क्रमांक '3' होता. त्यांच्या या अंदाजामुळे ते लॉटरी जिंकले आहेत. ल्यूथर नॉर्थ कॅरोलिनाच्या लिंकोलंटन येथे राहतात. त्यांनी नॉर्थ कॅरोलीन एज्युकेशनशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच लॉटरी काढली होती आणि अंदाज लावत त्यांनी आकडे निवडले आणि ही लॉटरी जिंकले.
ल्यूथर यांच्या कुटुंबियांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण आहे. जेव्हा त्यांनी लॉटरीचा नंबर चेक केला तेव्हा त्यांनी ते दोन कोटी ही रक्कम जिंकल्याचं समजलं. एवढी मोठी रक्कम आपण जिंकलोय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. जिंकलेल्या रक्कमेतून ते आपलं लोन फेडणार आहेत. तसेच गरजू लोकांना देखील मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"