कोरोना महामारीच्या (Corona Virus) पहिल्या वर्षातच जगभरातील विविध कंपन्यांना लस बनविण्यात यश आले आहे. कोणत्या कंपनीची कोणती लस प्रभावी यावर मतमतांतरे आहेत. चीनसारख्या देशांच्या काही लसी फेल ठरल्याच्या बातम्याही आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामध्ये ब्रिटनमधून (Britain) भारतीयांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी येत आहे. (AstraZeneca's COVID-19 vaccine shows one dose of the shot results in 80% less risk of death from the disease, Public Health England said on Monday.)
Corona vaccination: 12-15 वयोगटाच्या Pfizer-BioNTech लसीला परवानगी; लसीकरणावर अमेरिकेचा मोठा निर्णय
ब्रिटनमध्ये जगातील सर्वाधिक प्रमाणावर वरिष्ठ नागरिकांना लसीकरण झाले आहे. ऑक्सफर्ड- एस्ट्राझिनेकाच्या (AstraZeneca's Vaccine) लसीचा पहिला डोस घेणाऱ्य़ा लोकांना कोरानाचा धोका कमी असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. लस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झालेल्यांच्या मृत्यूमध्ये 80 टक्के घट झाली आहे. ही तीच लस आहे ज्या लसीचे भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु झाले आहे. तसेच ही लस भारतात कोव्हिशिल्ड (covishield) म्हणून ओळखली जाते.
Covishield लसीचे काय आहेत साईड इफेक्ट? लँसेटच्या अभ्यासात समोर आले सत्य
पब्लिक हेल्थ इंग्लंडने केलेल्या संशोधनानुसार अॅस्ट्राझिनेकाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यास कोरोनामुळे मृत्यूचा धोका हा 80 टक्क्यांनी कमी होतो. तर अमेरिकेच्या फायझर कंपनीची लस घेतल्य़ास दोन डोसनंतर मृत्यूचा धोका हा 97 टक्क्यांनी कामी होतो. ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी या आकड्यांची प्रशंसा केली आहे. हे आकडे याचे स्पष्ट पुरावे आहेत की, लस कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी खूप प्रभावी आहे.
पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या अंदाजानुसार आतापर्यंत देशात जेवढे लसीकरण झालेय त्यातून 10000 लोकांचे जीव वाचविता आले आहेत. ब्रिटनची लोकसंख्या ही 1 कोटी 80 लाख आहे. यापैकी तीन वयस्कर व्यक्तींमागे एकाला कोरोना लस टोचण्यात आली आहे. यामुळे ब्रिटनेमध्ये कोरोना संक्रमण, रुग्णांचे हॉस्पिटलायझेशन आणि मृतांचा आकडा खूप कमी झाला आहे. यामुळे आता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सरकार नागरिकांना कोरोना व्हायरसमुळे लावलेल्या निर्बंधांमध्ये सूट देण्याचा विचार करत असल्याचे सूतोवाच केले आहे.