शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

ग्रीन कार्ड हवे, शासकीय लाभावर पाणी फेरा, ट्रम्प प्रशासनाचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 04:27 IST

अनिवासी लोकांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवे असेल तर त्यांनी शासकीय लाभ सोडले पाहिजे. ट्रम्प प्रशासनाने हे नवे नियम तयार केले आहेत.

वॉशिंग्टन -  अनिवासी लोकांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवे असेल तर त्यांनी शासकीय लाभ सोडले पाहिजे. ट्रम्प प्रशासनाने हे नवे नियम तयार केले आहेत. ज्यांनी रेशन आणि अर्थसाहाय्य या आशयाचा शासकीय लाभ घेतला असेल किंवा जे लोक घेत असतील अशांना ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते. नव्या नियमांचा फटका अमेरिकेतील हजारो भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.अमेरिकेच्या गृहसुरक्षा मंत्र्यांनी प्रस्तावित नियमांवर २१ सप्टेंबर रोजी स्वाक्षरी केली. त्यानंतर ते मंत्रालयाच्या वेबसाईटवर टाकण्यात आले. सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान उद्योग तसेच नेत्यांनी याला विरोध दर्शविला आहे.नियमानुसार जे प्रवासी भारतीय स्वत:ची स्थिती किंवा व्हिसामध्ये बदल करू इच्छितात अथवा त्यांनी नव्याने अर्ज केला असेल अशांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नसल्याची खात्री करून घ्यावी लागेल. ट्रम्प प्रशासनाने काही दिवसांपूर्वी एका न्यायालयात असे सांगितले होते की, एच-४ व्हिसाधारकांचे वर्कपरमिट रद्द करण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यात अपेक्षित आहे. एच-४ चा सर्वाधिक लाभ अमेरिकेतील भारतीय समुदायाला मिळाला. ओबामा काळातील हा नियम रद्द झाल्यास सर्वाधिक फटका बसेल तो भारतीय महिलांना. वास्तव्याची मुदत वाढवू इच्छिणाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेतला नाही, घेत नाही आणि पुढेही घेणार नाही, असे शपथपूर्वक सादर करावे लागेल,असा नियमात प्रस्ताव आहे. आधीपासून अस्तित्वात असलेल्या नियमानुसार अमेरिकेचा प्रवास करू इच्छिणाºयांना ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सिद्ध करावे लागते. प्रस्तावित नियमांबाबतही लोकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत असल्याचे मत गृह सुरक्षा मंत्री ख्रिस्टजेन निल्सन यांनी व्यक्त केले.फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, ड्रॉपबॉक्स, याहू आणि गूगल यांच्यासारख्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाºया ‘एफडब्ल्यूडीडॉटयूएस’ने प्रस्तावित नियमांना विरोध दर्शविला आहे. आकड्यानुसार एप्रिलपर्यंत ६३२,२१९ भारतीय प्रवाशांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला होता.(वृत्तसंस्था)

टॅग्स :United Statesअमेरिकाnewsबातम्या