वॉशिंग्टन : ग्रीन टीमुळे सांधेदुखीच्या आजारात आराम मिळू शकतो, असा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. शरीराच्या काही भागांतील सूज वा अन्य दुखण्यावरही ग्रीन टी लाभकारक असल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीतील या संशोधनाचे प्रमुख सलाहउद्दीन अहमद म्हणाले की, सांधेदुखी हा एक असा आजार आहे की, जो शरीराच्या अनेक भागांना जर्जर करतो. साधारणत: हात आणि पायांच्या जोडभागात वेदना होतात. सांधेदुखीची औषधेही महाग आहेत आणि बऱ्याचदा दीर्घ काळासाठी घेतल्यास त्याचा परिणामही पाहिजे तसा दिसत नाही. या संशोधनात अहमद यांच्यासह युनिव्हर्सिटीचे संशोधक अनिल सिंग, सादिक उमर यांचा समावेश आहे. बिहारमधील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फार्मास्युटिकल्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्चमध्ये याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)
सांधेदुखीवर ‘ग्रीन टी’चा रामबाण उपाय?
By admin | Published: February 18, 2016 6:39 AM