न्यूयॉर्क : १४ वर्षांपूर्वी ९/११ च्या हल्ल्यात न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर नष्ट झाले होते. या जागेवर आता भव्य रेल्वे स्टेशन उभारण्यात आले आहे. या रेल्वे स्टेशनची दुसरी बाजू म्हणजे ते जगातील सर्वात महागडे रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन आता जनतेसाठी खुले होत आहे. अर्थात उद्घाटनासारखे कोणतेही सोपस्कार होणार नाहीत. न्यूजर्सी आणि न्यूयॉर्क सब वे लाईनला जोडणारे हे रेल्वे केंद्र आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये दुकाने आणि रेस्टॉरंटही आहे. या इमारतीला स्पॅनिश- स्वीस वास्तुकार सेंटियागो कालात्रावाने डिझाईन केले आहे. अंडाकार इमारतीसाठी स्टीलचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आहे. काचेच्या फ्रेम लक्ष वेधून घेतात. (वृत्तसंस्था)हे स्टेशन उभारण्यासाठी १२ वर्षांचा कालावधी लागला. या रेल्वेस्थानकासाठी ३५० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली आहे. पक्ष्याच्या पंखाचा आभास निर्माण करणारी ही कलाकृती डोळे दिपवणारी आहे.
ग्राऊंड झीरोवर रेल्वे स्टेशनची भव्य वास्तू
By admin | Published: March 04, 2016 2:38 AM