ओटावा (कॅनडा) - पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कॅनडामध्ये घडली आहे. येथील सुसन नावाच्या तरुणीचे तिच्या बालपणीच्या मित्रासोबत लग्न ठरले होते. विवाहासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. एखाद्या परिकथेतील विवाह सोहळ्याप्रमाणे हा विवाह सोहळा संपन्न होत होता. पण हा विवाह फेअरी टेलच्या अंदाजात होऊ शकला नाही कारण विवाहाला आलेल्या पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिला. अखेरीस संतापलेल्या नवरीने हे लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. सूसन आणि तिच्या प्रियकराची लहानपणी भेट झाली होती. काही वर्षांनी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 18 व्या वर्षी सुसनचा साखरपुडा झाला होता. तसेच 20 व्या वर्षी ती आई झाली. मात्र तिच्या प्रेमकहाणीचा फेअरी टेलसारखा शेवट होऊ शकला नाही. विवाह मोडल्यानंतर नवरीने फेसबूक पोस्टवरून आपला राग व्यक्त केला असून, तिची फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून सूसनने आलेल्या पाहुण्याची माफी मागितली आहे. मात्र विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांवर तिने ताशेरे ओढले आहेत. "मी तुम्हा सर्वांना फेअरी टेलसारख्या विवाहात निमंत्रित केले होते. तसेच मला आहेरात रोख रक्कम देण्याची मागणी केली होती. आता जर तुम्ही रोख रक्कम दिली नाही तर आमच्या या आलिशान विवाहाचा खर्च कसा पूर्ण होईल?," असा सवाल तिने पाहुण्यांना केला. या महागड्या विवाहासाठी 60 हजार कॅनेडियन डॉलरची गरज होती. मात्र या विवाहाला मदत करण्यासाठी केवळ 8 जण तयार झाले. आपल्या आधीच्या कुटुंबीयांनी पाच हजार डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र नंतर त्यांनीही नकार दिला. त्यानंतर आणखी काही जणांनी मदत करण्याचा नाकारले. त्यामुळे दु:खी झालेल्या सुसनने अखेरीस विवाह मोडण्याचे ठरवले.
पाहुण्यांनी बिल भरण्यास नकार दिल्याने नवरीने मोडले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 12:23 PM