सिंगापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची १२ जून रोजी सिंगापूरमध्ये होणाऱ्या भेटीकडे सा-या जगाचे लक्ष लागले असून, या भेटीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नेपाळमधील गुरख्यांकडे देण्यात आली आहे.या दोन्ही नेत्यांसोबत त्यांची स्वत:ची सुरक्षा व्यवस्था असेलच. पण जिथे या दोघांची भेट होणार आहे, तिथे सिंगापूर पोलीस, गुरखा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येत आहे. त्या भागांतील सर्व रस्ते, हॉटेल्स येथील तसेच मुत्सद्दी, राजनैतिक अधिकारी या सर्वांचे रक्षण करण्याचे काम गुरख्यांच्या सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे संरक्षण सचिव जीम मॅटिस यांनी नुकतीच सिंगापूरला भेट दिली, तेव्हाही सुरक्षेची जबाबदारी गुरख्यांकडेच होती. नेपाळच्या डोंगराळ भागांत राहणाºया गुरख्यांना सिंगापूर पोलीस दलात सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे सुरक्षा जॅकेट्स, बेल्जियन बनावटीचे स्कार कॉम्बॅट असॉल्ट रायफल, पिस्तुले हे सारे असेल. (वृत्तसंस्था)लढवय्या जमातसिंगापूर पोलीस दलात गुरख्यांची संख्या सुमारे १८00 असावी, असे सांगण्यात येते. गुरख्यांना लढवय्या जमात म्हणून ओळखले जाते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना सैन्यदलांमध्ये भरती करुन घेतले होते. आताही नेपाळबरोबच नेपाळ, सिंगापूर, इंग्लंड, ब्रुनेई या देशांच्या लष्करांमध्ये गुरखा बटालियन आहेत. दोन्ही महायुद्धांत, फॉकलंड बेटांसाठीच्या लढाईत व अलीकडील अफगाणिस्तान कारवाईतही गुरखा जवानांचा सहभाग होता.हॉटेलचा खर्च देणार नोबेलप्राप्त संस्थाअत्यंत महागड्या असलेल्या शांगरी ला या हॉटेलचा खर्च अण्वस्त्रविरोधात काम करणाºया संस्थेने करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प-उन यांच्या भेटीसाठी सिंगापूरमध्ये गुरख्यांची सुरक्षा; शहरात प्रचंड बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 11:54 PM