कॉनिक्री : जागतिक आरोग्य संघटनेने गिनी देश इबोला व्हायरसमुक्त झाल्याचे सोमवारी जाहीर केले. गेली दोन वर्षे देशात इबोलाने २५०० लोकांचे प्राण घेतले. या घोषणेचे देशात स्वागत झाले. त्यासाठी काही समारंभ झाले, तर काहींनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. काही आफ्रिकी देशांत काही महिन्यांपासून इबोलाची बाधा झाली होती. सिएरा लिओन व लायबेरियात ९ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले. यापैकी सिएरा लिओन नोव्हेंबरात व्हायरसमुक्त जाहीर झाला; पण सप्टेंबरात मुक्त जाहीर होऊनही लायबेरियात काही रुग्ण आढळले आहेत. इबोलाचे वरील तीन देशांवर सामाजिक परिणाम खूप झाले आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार जवळपास ६ हजार मुलांनी आपले पालक, एक वा दोन्ही गमावले आहेत. सुमारे शंभरावर आरोग्य कर्मचारी इबोलाला बळी पडले. आजही बरे झालेले हजारो रुग्ण त्याच्या दहशतीखाली व संभाव्य परिणामांच्या छायेखाली जगत आहेत.आतापर्यंतचे मृत्यू : १३३१५ २० डिसेंबरअखेरलायबेरिया - ४८०९ सिएरा लिओन - ३९५५ गिनी - २५३६ नायजेरिया - ८ एक रुग्ण अमेरिकेत दगावला तर सहा मालीमध्ये
गिनी इबोला व्हायरस फ्री घोषित
By admin | Published: December 30, 2015 2:30 AM