बीजिंग : चीनच्या गुराख्याला पश्चिम शिनजियांग या स्वायत्त प्रांतात खुल्या मैदानावर ७.८५ किलो वजनाचा सोन्याचा गोळा सापडला. ३० जानेवारी रोजी सापडलेल्या या घबाडाची किंमत १.६ दशलक्ष युआन (२,५५,००० अमेरिकन डॉलर) आहे. बेरेक सुवूट असे या कझाक गुराख्याचे नाव आहे. ओबडधोबड आकारातील हे सोने स्टँडर्ड सोन्यापेक्षा अनेकपटींनी शुद्ध असते, असे स्थानिक तज्ज्ञाने सांगितले. हा गोळा २३ सेंटीमीटर लांब, १८ सेंटीमीटर रुंद व ८ सेंटीमीटर जाड आहे. असे गोळे ८० ते ९० टक्के शुद्ध असतात व बहुतांश वेळा असे सोने खाणीत सापडते.(वृत्तसंस्था)
चीनमध्ये गुराख्याला सापडला ७.८५ किलो सोन्याचा गोळा
By admin | Published: February 07, 2015 2:43 AM