वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एच-वन बी व्हिसासंबंधी कार्यकारी आदेश काढण्याची कोणतीही योजना नाही, असा दावा ट्रम्प यांचे पाठीराखे आणि प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन देणगीदार शलभ ‘शॅली’ कुमार यांनी बुधवारी केला. एच वन-बी व्हिसाबाबत प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तांमुळे भारतात काळजी व्यक्त केली जात आहे. त्याचे कुमार यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘‘एच-वन बी व्हिसांची आणखी गरज असेल. एच-वनबी व्हिसावर भारतातून येणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे. शल्ली कुमार रिपब्लिकन हिंदू कोएलिशनचे प्रमुख आहेत. ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. एच-वनबी व्हिसांबाबत त्यांना वार्ताहरांनी अनेक प्रश्न विचारले. या व्हिसांबद्दल अशी कोणताही कार्यकारी आदेश तयार केला जात नाही, असे ते म्हणाले. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे, असे कुमार यांनी म्हटले.ग्रीन कार्डधारकांना वगळले- अमेरिकेने ज्या सात मुस्लीमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली आहे त्या या देशांच्या अमेरिकेत कायदेशीररीत्या कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्यांना अमेरिकेत येण्यासाठी विशेष परवानगीची गरज नाही. - ही घोषणा बुधवारी व्हाइट हाउसचे प्रवक्ते सीन स्पाई स्पाइसर यांनी केली. ते म्हणाले की प्रवेशबंदी असली तरी ग्रीन कार्डधारक त्यांच्या इच्छेनुसार अमेरिकेत येऊ शकतात किंवा बाहेर जाऊ शकतात. - २६ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी काढलेल्या अमेरिका प्रवेशबंदीच्या आदेशावर जगभर जोरदार टीका होत आहे. २६ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी काढलेल्या अमेरिका प्रवेशबंदीच्या आदेशावर जगभर जोरदार टीका होत आहे.रेक्स टिलरसन यांचा शपथविधी- अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणून रेक्स टिलरसन यांनी शपथ घेतली. एक्झॉन मोबिल या बलाढ्य कंपनीचे माजी अध्यक्ष असलेले टिलरसन यांच्या नियुक्तीला सिनेटने मान्यता दिल्यानंतर त्यांचा शपथविधी व्हाइट हाउसच्या ओव्हल आॅफिसमध्ये झाला. डोनाल्ड ट्रम्प या वेळी म्हणाले की, ‘‘मध्यपूर्व आणि जगातील अनेक आव्हाने तुमच्यापर्यंत वारसाने आली असली तरी आम्ही या खूपच कठीण काळात शांतता आणि स्थैर्य निर्माण करू असा मला विश्वास आहे.’’
एच-वनबी व्हिसावरील बंदीचा आदेश येणार नाही
By admin | Published: February 03, 2017 12:49 AM