दिग्गज नेते, सेलेब्रिटी आणि कंपन्यांचे ट्विटर अकाऊंट बुधवारी हॅक करण्यात आल्याने सोशल मीडियात खळबळ माजली आहे. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये माइक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, अमेरिकी रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, बराक ओबामा, इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, वॉरेन बफेट, अँप्पल, उबरसह अन्य ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहेत.
याबाबत ट्विटरने सांगितले आहे की, ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी काम सुरु आहे, अनेक दिग्गजांचे प्रोफाइल ट्विटर अकाऊंट एकत्र क्रिप्टोकरंसीज घोटाळ्यासाठी हॅक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
पोस्टमध्ये बिटकॉइनसाठी मागितलं डोनेशन
बिल गेट्स यांच्या अकाऊंटमध्ये पोस्ट करण्यात करण्यात आलं आहे की,'प्रत्येकजण मला परत देण्यास सांगत आहे, आता वेळ आली आहे. तुम्ही मला एक हजार डॉलर्स पाठवा, मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स परत पाठवीन.
टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांच्या अकाऊंटवर पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, पुढील एक तासात बिटकॉइनमध्ये पाठवलेली रक्कम दुप्पट होऊन तुम्हाला परत केली जाईल. बिटकॉइन पत्त्याच्या लिंकसह ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. मी कोविड साथीच्या आजारामुळे दान करीत आहे.
अमेरिकेचे प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्टसोबत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, जगातील सर्वात मोठी कंपन्यांमधील उबर आणि Apple यांचे ट्विटर अकाऊंटही हॅक करण्यात आले आहेत.
अल्पावधीतच, शेकडो लोकांनी हॅकर्सना दहा लाखांहून अधिक डॉलर्स पाठविले. ज्या अकाऊंटला लक्ष्य केले होते त्यांना लाखो फॉलोअर्स होते, या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यात येत असून लवकरच अधिकृत निवेदन सादर करण्यात येईल असं ट्विटरने स्पष्टीकरण दिलं आहे.