लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याने मिल्ली मुस्लीम लीगचे (एमएमएल) येथील पहिले कार्यालय रविवारी सुरू केले. एमएमएलची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यास सईद याने केलेल्या अर्जाला पाकिस्तान सरकारने एमएमएल राजकारणात हिंसाचार व अतिरेक पसरवेल, असे म्हणून विरोध केला होता.देशात २०१८ मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुका माझी संघटना जमात-ऊद-दावा एमएमएलच्या झेंड्याखाली लढविणार असल्याचे सईद याने सांगितले. बंदी असलेल्या जमात-ऊद-दावा व लश्कर ए तय्यबाची एमएमएल ही शाखा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करून घेण्यास गेल्या आॅक्टोबरमध्ये निवडणूक आयोगाने दिलेल्या नकाराला एमएमएलने आव्हान दिले होते. सईद याने येथील नॅशनल असेम्ब्ली-१२० मतदार संघात आपल्या कार्यालयाचे उद््घाटन केले. गेल्या सप्टेंबरमध्ये जमात ऊद दावाच्या सदस्याने पोटनिवडणूक लढवली होती. सरकारकडून विरोध होत असला, तरी सईद याने राजकारणात प्रवेश करण्याचा निश्चय केला आहे. (वृत्तसंस्था)
लाहोरमध्ये हाफीज सईदच्या पक्षाचे कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 3:54 AM