शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हाफिजला का पाळलंय? शरीफना पक्षाकडून घरचा अहेर

By admin | Published: October 07, 2016 10:58 AM

कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि अन्य दहशतवाद्यांविरोधात कारवाई का होत नाही? हाफिज सईद अशी कोणती अंडी देत आहे, म्हणून त्याला आपण पाळून ठेवला आहे?

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. 7-  मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदविरोधात कारवाई होत नसल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पक्षांतर्गतच रोषाला सामोरे जावे लागत आहे. कुख्यात दहशतवादी हाफिज सईद आणि अन्य दहशतवाद्यांविरोधात कारवाई का होत नाही? हाफिज सईद अशी कोणती अंडी देत आहे, म्हणून त्याला आपण पाळून ठेवला आहे? असे प्रश्न विचारत शरीफ यांच्याच पक्षातील खासदार राणा मोहम्मद अफजल यांनी हल्लाबोल चढवला आहे. एकप्रकारे या खासदाराने शरीफ यांना घरचा अहेर दिला आहे. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानमध्ये गुरुवारी परराष्ट्र व्यवहार समितीची बैठक झाली. जागतिक पातळीवर पाकिस्तानसमोर निर्माण झालेल्या अडचणींसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.  चर्चेदरम्यान, खासदार राणा मोहम्मद अफजल यांनी आपल्याच सरकारवर नाराजी व्यक्त करत, 'आजपर्यंत आपण हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करू शकलो नाही. भारत याच मुद्याचा फायदा घेत जागतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करू पाहत आहे. सईदसारख्या दहशतवाद्यांच्या विषयामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध देखील ताणले जात आहेत. असे देखील अफजल यांनी यावेळी नमूद केले.
 
आणखी बातम्या
 
डॉनच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पडण्याची भीती देखील पाकिस्तानने व्यक्त केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांविरोधात सरकारद्वारे करण्यात येणा-या कारवाईमध्ये गुप्तचर यंत्रणा हस्तक्षेप करणार नाही, असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आल्याचे माहिती मिळत आहे.