शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

हायफा; भारतीय सैनिकांनी रक्त सांडलेली पावनयुद्धभूमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 11:41 AM

तत्कालीन पॅलेस्टाइनच्या हद्दीमध्ये असणारे हे बंदर मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी होते. त्यावेळेस या सर्व भागावर तुर्कांचे राज्य होते. तुर्कांविरोधात लढण्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांची मदत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानांना विनंती केली.

मुंबई- इस्रायल आणि भारत यांचे संबंध गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वृद्धींगत होत आहेत. इस्रायलमध्ये १०० वर्षांपुर्वी भारतीय सैनिक लढण्यासाठी गेले होते हे आपल्याला माहिती नसते. हायफा हे पर्यटकांसाठी एक आकर्षण म्हणून ओळखले जाते. या शहराला भेट देण्यापूर्वी २३ सप्टेंबर १९१८ रोजी झालेल्या घटनेबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. दोनच दिवसांनी या लढाईला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.तत्कालीन पॅलेस्टाइनच्या हद्दीमध्ये असणारे हे बंदर मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी होते. त्यावेळेस या सर्व भागावर तुर्कांचे राज्य होते. तुर्कांविरोधात लढण्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांची मदत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानांना विनंती केली. जोधपूर व म्हैसूर संस्थानाच्या सैनिकांनी प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभाग घेतला. बलाढ्य शत्रूविरोधात लढताना  हायफा शहरात घुसण्याचा निर्णय भारतीय सैनिकांनी घेतला. १५ हजार भारतीय सैनिक शहरात घुसले.  इम्पिरियल सर्विसच्या १५ व्या घोडदळाने पहाटे हायफाच्या दिशेने कूच केले आणि सकाळी १० वाजेपर्यंत शहराच्या मुख्यद्वारापर्यंत मजल मारली.  

लढाईच्या सुरुवातीसच कर्नल ठाकूर दलपत सिंह यांना हौतात्म्य आले. त्यांच्यानंतर डेप्युटी कमांडक अमनसिंह जोधा यांनी सूत्रे सांभाळली. म्हैसूर आणि जोधपूरच्या सैनिकांनी दुपारी ३ वाजेपर्यंत तुर्की सैनिकांच्या बहुतांश चौक्या उद्धवस्त केल्या. दुपारी ४ वाजेपर्यंत हायफा तुर्कांच्या तावडीतून स्वतंत्र करण्यात भारतीयांना यश आले. मात्र या लढाईत ९०० सैनिकांचे प्राण गेले. ठाकूर दलपत सिंह यांना मरणोत्तर मिलिटरी क्रॉसने सन्मानित करण्यात आले. तसेच कॅप्टन अनुप सिंह आणि सेकंड लेफ्टनंट सागत सिंह यांनाही मिलिटरी क्रॉस देण्यात आले. कॅप्टन अमनसिंह जोधा आणि दफादार जोरसिंह यांना इंडियन आॅर्डर आॅफ मेरिट पदकाने सन्मानित करण्यात आले. इस्रायलमध्ये आजही २३ सप्टेंबर हायफा दिवस म्हणून साजरा केला जातो व पाठ्यपुस्तकांमध्ये या शौर्यगाथेचा समावेश करण्यात आला आहे. हायफा सिमेट्री या  स्मशानभूमीत हे सैनिक चिरनिद्रा घेत आहेत. दिल्लीमध्ये हुतात्म्यांच्या स्मरणार्थ तीन मूर्ती हे स्थळ उभारण्यात आले आता या चौकाचे नाव तीन मूर्ती हायफा चौक असे करण्यात आले आहे.  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी भारतभेटीमध्ये तीन मूर्ती येथे जाऊन पुष्पचक्र अर्पण केले होते. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल भेटीमध्ये हायफा सिमेट्रीला भेट देऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

टॅग्स :Israelइस्रायलNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू