शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हजमध्ये मृत्यूचे तांडव!

By admin | Published: September 25, 2015 3:35 AM

पवित्र मक्केपासून जवळच असलेल्या मीना येथे गुरुवारी हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ भाविकांचा मृत्यू झाला असून ८०५ नागरिक जखमी झाले आहेत.

पवित्र मक्केपासून जवळच असलेल्या मीना येथे गुरुवारी हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ७१७ भाविकांचा मृत्यू झाला असून ८०५ नागरिक जखमी झाले आहेत. सैतानाला दगड मारण्याच्या वेळी (एक धार्मिक प्रथा) गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.मीना शहरात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. याच वेळी ही दुर्घटना घडली. भारतातून मक्का येथे दाखल झालेले भाविक हज समितीच्या माध्यमातून येथे आले आहेत. जखमी नागरिक एवढे भयभीत झाले आहेत, की ते अक्षरश: काही बोलूही शकत नाहीत. सुप्रीम हज कमिटीचे अध्यक्ष मोहंमद बिन नायफ यांनी सेक्युरिटी लीडर्सची तातडीने बैठक बोलाविली असून वेगाने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. मृतांत चार भारतीय मृतांमध्ये एक महिला आणि एका स्वयंसेवकासह चार भारतीयांचा समावेश असून दोन भारतीय जखमी झाले आहेत, असे जेद्दाहस्थित भारतीय वकिलातीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मोहंमद (कोडुंगलूर-केरळ) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती केरळच्या ग्रामीण विकास आणि अनिवासी केरळी कल्याणमंत्री के. सी. जोसेफ यांनी थिरुवअनंतपूरम येथे दिली. हैदराबादच्या बीबी जान यांचाही मृतांत समावेश असल्याचे तेलंगणा राज्य हज समितीचे विशेष अधिकारी एस. ए. शुकूर यांनी सांगितले. बीबी जान या पती आणि अन्य दोन नातेवाईकांसोबत २ सप्टेंबर रोजी हज यात्रेला गेल्या होता. त्यांचा मीना येथील इस्पितळात मृत्यू झाला. आसाममधील दोन जण जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. एकाच रस्त्यावर भाविक अडकलेया दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकले नसले तरी प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका अरुंद जागी ही दुर्घटना झाली. काही भाविक सैतानाला दगड मारण्याच्या प्रथेसाठी एका रस्त्याने जात होते, तर ही प्रथा पूर्ण करून आलेले भाविक याच रस्त्याने परत येत होते. त्यामुळे रस्ता बंद होऊन ही चेंगराचेंगरी झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे....अन् चेंगराचेंगरी झालीप्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार दुसरा एक अंदाज वर्तविला जात आहे की, सुरक्षारक्षक भाविकांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते आणि पुढे न जाण्याविषयी विनंती करत होते; पण भाविक न थांबता या रस्त्याने पुढे जाऊ लागले आणि चेंगराचेंगरी झाली.राष्ट्रपती, पंतप्रधानांना दु:खसर्वांत मोठ्या हजच्या धार्मिक यात्रेत झालेल्या प्राणहानीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी टिष्ट्वटरवर शोकसंदेश टाकून मृतांविषयी सांत्वना व जखमींसाठी प्रार्थना केली.भारताचे महावाणिज्य दूत बी. एस. मुबारक हे दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी होते. जखमींमध्ये काही भारतीयांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय भाविक हे अल अरब आणि अल जवाहरा या रस्त्याने जात होते, तर दुर्घटना अन्य रस्त्यावर झाल्याने जखमींमध्ये जास्त भारतीय नाहीत असे ते म्हणाले. हजसाठी भारतातून एक लाख चाळीस हजार भाविक पवित्र मक्का येथे दाखल झाले आहेत.जखमींना मीना आणि अन्य शहरातील हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींमध्ये सर्वाधिक आफ्रिकन आणि सौदी अरबमधील भाविकांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.या दुर्घटनेत ७१७ भाविक मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला सौदीच्या प्रशासनाने दुजोरा दिला आहे.काही दिवसांपूर्वीच क्रेन दुर्घटनेत १०७ भाविक मृत्युमुखी पडले होते. २००६ मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत येथे ३०० भाविक मृत्युमुखी पडले.जगभरातून वीस लाखांहून अधिक भाविक दरवर्षी हज यात्रेसाठी येथे दाखल होतात. जखमींच्या मदतीसाठी ४००० नागरिक तैनात, तर सेवेला २०० अ‍ॅम्ब्युलन्स.हज यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनामृतजखमी2 जुलै 1990 पदपथावर सुरुंगस्फोट 1426 23 मे 1994 सैतानाला दगड मारण्याची परंपरा 270 9 एप्रिल 1998 जमारात पूल दुर्घटना 118 180 5 मार्च 2001 सैतानाला दगड मारण्याची परंपरा 3511 फेब्रुवारी 2003 सैतानाला दगड मारण्याची परंपरा 141 फेब्रुवारी 2004 सैतानाला दगड मारण्याची परंपरा, मीना 25124412 जानेवारी 2006 सैतानाला दगड मारण्याची परंपरा, मीना 346 289