जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 99 लाख 19, 509 इतका झाला आहे. त्यापैकी 53 लाख 72, 240 रुग्ण बरे झाले असून 4 लाख 97,255 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. कोरोना रुग्णांचा आकडा हा आणखीन वाढणार असल्याचे WHOनं जाहीर करताना आगामी आव्हानांचा सामना करण्यास सज्ज राहण्यास सांगितले. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 09,360 इतकी झाली आहे आणि त्यापैकी 43,414 जणांना प्राण गमवावे लागले. ब्रिटनमधल्या कोरोना रुग्णांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. परदेशातून आलेल्या एकूण प्रवाशांपैकी निम्मे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पाकिस्तानातून आल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्य विभागानं केला आहे.
The Telegraph ने या संबंधिचे वृत्त आकड्यानुसार प्रसिद्ध केले आहे. कोरोनाचा उच्च धोका असलेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन चेकअप करणं आव्हानात्मक आहे. 1 मार्चपासून पाकिस्तानातून 190 विमानांतून जवळपास 65 हजार लोकं ब्रिटनमध्ये आली. एका दिवसात 4000 रुग्ण आढळले होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती इंग्लंडच्या आरोग्य विभागानं दिली. 4 जूनपासून पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये आलेल्या प्रवाशांमध्ये 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
पाकिस्तानातून दर दिवशी दोन विमानं ब्रिटनमध्ये दाखल होतात आणि त्यापैकी काही प्रवाशी स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जातात. पाकिस्तानातून हाँगकाँगला निधालेल्या विमानातील 30 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते आणि त्यानंतर इमिरेट्सनं विमान सेवा स्थगित केली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानं एप्रिलच्या सुरुवातीपासून थेट ब्रिटनमध्ये जात आहेत. प्रवाशांचे हिट सेन्सरने स्क्रीनींग होत असल्याची माहिती, प्रवक्त्यांनी दिली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!
पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह
अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही
Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...