Noga Weiss, Hamas Terrorist Propose: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. गाझा पट्ट्यात अनेक लोकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. गाझामध्ये 50 दिवसांच्या तुरुंगवासानंतर करारानुसार काहींची नुकतीच सुटका करण्यात आली. त्या सुटका झालेल्यांमधील इस्रायली तरुणीने एका धक्कादायक खुलासा केला. एका 18 वर्षीय इस्रायली मुलीने सांगितले की, 7 ऑक्टोबरला तिचे किबुट्झ बेरी शहरातील घरातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिला जेथे बंदी म्हणून ठेवण्यात आले होते तेथील हमासच्या एका सैनिकाने तिला अंगठी दिली आणि सांगितले होते की, मी तुझ्याशी लग्न करेन आणि तू माझ्या मुलांची आई होशील.
नोगा वीस असे या 18 वर्षीय तरुणीचे नाव आहे. तिने सांगितले की, तिच्या तुरुंगवासाच्या 14व्या दिवशी त्या हमासच्या दहशतवाद्याने तिला अंगठी देत प्रपोज केले आणि सांगितले की ओलीस ठेवलेल्यांना ५० दिवसांनी सोडले जाईल, पण तू माझ्यासोबतच राहशील आणि माझ्याशी लग्न करून माझ्या मुलांना जन्म देशील. एका रिपोर्टनुसार, नोगाने देखील तिला गोळ्या घालू नये म्हणून हसण्याचे नाटक केले.
अपहरणाच्या दिवशीची गोष्ट सांगताना ती म्हणाली की, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हजारो हमास दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा नोगा वेस किबुट्झ बेरी येथील तिच्या घरी होती. तिचे वडील इलन किबुट्झ आपत्कालीन दलात सामील होण्यासाठी घर गेले ते परतलेच नाहीत. नंतर समजले की त्याच दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर दहशतवाद्यांनी घराच्या दरवाजावर गोळीबार केला आणि नोगा व तिची आई (53) शिरी दोघींचे अपहरण केले. असे असले तरी आई आणि मुलगी दोघी अनेक दिवस भेटू शकले नाहीत.
नोगा पुढे म्हणाली की, तिने दहशतवाद्यांपासून लपून पळण्याचा प्रयत्न केला, पण एकाने तिला पाहिले आणि अडवले. 40 रायफलधारी दहशतवाद्यांनी तिला घेरले आणि काही लोकांचे मृतदेह दाखवून घाबरवले. त्यानंतर तिने पळण्याचा विचार सोडून दिला.