शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:13 PM

इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले

Israel-Hamas War :इस्रायल आणि हमास यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून भीषण संघर्ष सुरू आहे. या संघर्षात इस्रायलच्या हाती मोठे यश आले आहे. इस्रायली सैन्याने हमास प्रमुख याह्या सिनवार याला अखेर ठार केले आहे. आयडीएफच्या माहितीनुसार, इस्रायलने गाझात केलेल्या हल्ल्यात हमासचे 3 दहशतवादी मारले गेले, ज्यात याह्या सिनवार याचाही समावेश होता. डीएनए चाचणीतून याची पुष्टी झाली आहे. सिनवार हा इस्रायलवर ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि हमासचा प्रमुख होता.

यापूर्वी IDF ने एक निवेदन जारी केले होते, ज्यात गाझामध्ये 3 दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली होती. आता यातील एक याह्या सिनवार असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, सिनवारला यावर्षी ऑगस्टमध्ये हमासचा प्रमुख बनवण्यात आले होते. 31 जुलै रोजी तेहरानमध्ये इस्माईल हानियाच्या मृत्यूनंतर याह्या सिनवार याच्याकडे हमासची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

तीन महिन्यांत तीन मोठे शत्रू मारले!गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने दक्षिण इस्रायलवर मोठा हल्ला केला होता, ज्यामध्ये सुमारे 1200 इस्रायली मारले गेले होते. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, हमासच्या या संपूर्ण हल्ल्याचा सिनवार हा मुख्य सूत्रधार होता. त्याची हत्या हा इस्रायलचा मोठा विजय आहे. यापूर्वी 27 सप्टेंबर रोजी इस्रायलने लेबनॉनमधील बेरूत येथे हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाहला ठार केले होते. अशाप्रकारे, केवळ 3 महिन्यांत इस्रायलने आपल्या 3 सर्वात मोठ्या शत्रूंना ठार केले आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध