गाझा/जेरुसलेम : अखेर हमासने गाझापट्टीत २४ तासांसाठी मानवीय शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केला आहे. आधी संयुक्त राष्ट्राचा हा प्रस्ताव हमासने धुडकावून लावता इस्रायलने पुन्हा गाझापट्टीत लष्करी हल्ले सुरू केले होते. ईदचे पावन पर्व तसेच गाझापट्टीतील नागरिकांच्या जीवनमानाचा विचार करून सर्व पॅलेस्टिनी संघटनांनी रविवारी दुपारी २ वाजेपासून २४ तासांसाठी शस्त्रसंधीसाठी तयारी दाखविली आहे, असे हमासचे प्रवक्ते सामी अबू झुहरी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.हमास आणि इस्रायल लष्कराच्या परस्परांवरील हल्ल्यात गेल्या २० दिवसांत १,०६० पॅलेस्टिनी, भारतीय वंशाच्या एका सैनिकांसह ४६ इस्रायली मृत्युमुखी पडले आहेत. वाढीव शस्त्रसंधीचा प्रस्ताव धुडकावून हमास बंडखोरांनी आधीच्या १२ तासांची शस्त्रसंधीची मुदत संपताच गाझापट्टीतून इस्रायलच्या दिशेने अनेक रॉकेट्स डागले भारतीय वंशाचा २७ वर्षीय सैनिक बराक राफेल देगोरकर ठार झाल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. उखळी तोफांच्या हल्ल्यात तो गंभीर झाला होता. मानवी दृष्टिकोनातून आम्ही गाझापट्टीतील जनतेसाठी शस्त्रसंधी मान्य केली होती; परंतु हमास बंडखोरांनी रॉकेट हल्ले सुरूच ठेवले. परिणामी, आम्ही गाझापट्टीत हवाई, सागरी आणि जमिनीवरून हल्ले सुरू करणार असल्याचे इस्रायली डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) स्पष्ट केले होते. इस्रायलने रात्री उशिरा शस्त्रसंधी आणखी २४ तासांनी वाढविली होती; गाझापट्टीतून इस्रायली रणगाडे माघारी घेणे, नागरिकांना घरांपर्यंत जाता येईल, अशी व्यवस्था करणे आणि मृतदेह नेणाऱ्या वाहनांना गाझात ये-जा करण्याची मुभा मिळाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मानवीय शस्त्रसंधी वैध मानली जाणार नाही, असे सांगत हमासने हमासने शस्त्रसंधीची मुदत वाढविण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र, नंतर हमास शस्त्रसंधीला तयार झाल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)हमास बंडखोरांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास इस्रायली लष्कर कारवाई करील, असे निर्णय इस्रायलच्या मंत्रिमंडळाने घेतला होता.
हमास अखेर शस्त्रसंधीसाठी राजी
By admin | Published: July 28, 2014 2:31 AM