इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाला मोठा इतिहास आहे. यातच आज पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर अगदी फिल्मी स्टाईलने हल्ला केला. या दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीने इस्त्रायलवर हल्ला केला, तसा हल्ला इतर कुठल्या दहशतवादी संघटनेने कुणावर केल्याचे आपण क्वचितच पाहिले असेल.
हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. हमासने केवळ रॉकेटच डागले नाहीत, तर त्यांचे दहशतवादीही पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने इस्रायलमध्ये शिरले आहेत. मिसाईल हल्ल्यांनंतर त्यांनी, गोळीबार सुरू केला. सध्या इस्रायलच्या रस्त्यांवरून दहशतवादी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. याचे व्हिडिओ पाहून आपल्याला 26/11 च्या मुंबई हल्ल्याची आठवण होईल.
हमासचा लिडर मोहम्मद दीफने आधिपासूनच रिकॉर्ड केलेल्या एका मेसेजमध्ये म्हटले आहे, 'आम्ही ईश्वराकडे मदत मागीतली आहे आणि हे सर्व नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. जेने करून शत्रूला संपवता येईल. आम्ही ऑपरेशन अल अक्सा फ्लडची घोषणा करत आहोत. हल्ल्यापूर्वी 20 मिनिटांत 5000 मिसाइल आणि गोळे दाकण्यात आले आहेत.' यातच, एक व्हिडिओही हमासने जारी केला आहे. यात, ते दीर्घकाळापासूनच याची तयारी करत होते, असे दिसते. या दहशतवाद्यांनी पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने बॉर्डर क्रॉस केली आहे.
पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने पार केली भिंत -संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात, दहशतवाद्यांनी लष्कराचा गणवेश परिधान केल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे शस्त्रेही आहेत. हे दहशतवादी फायरिंग रेन्जमध्ये प्रैक्टिस करत आहेत. इस्रायलने सुरक्षितता म्हणून एक संरक्षण भिंत बांधली आहे. ही भिंत पार करण्यासाठी दहशतवाद्यांनी पॅराग्लायडिंग केले. या फोटोंनी संपूर्ण जगाला चकित केले आहे. याच बरोबर एका मोठ्या युद्धाची चिंताही वाढली आहे.