अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गाझापट्टीच खाली करण्याची मागणी केली आहे. ही जागा अनेक शतकांपासून विनाशकारीच राहिली असून ती रिकामी केल्यास तेथील मानवजात ही शांततेत आणि सुखाने राहू शकेल असे मत त्यांनी मांडले आहे. यानंतर लगेचच अमेरिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची जबाबदारी असलेल्या उद्योजक, विचारवंत, अर्थतज्ञांच्या डॉज या समितीने गाझा पट्टीसाठी बायडेन सरकारने दिलेला विशेष निधी रोखला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा पट्टीमध्ये लोकसंख्या वाढ रोखण्याच्या उद्देशाने कंडोम वितरणासाठी पाच करोड डॉलरचा निधी दिला होता. यावर ट्रम्प सरकारने रोख लावली आहे. अब्जाधीश एलन मस्क अध्यक्ष असलेल्या डिपार्टमेंटऑफ गव्हर्नमेंट एफिशिअंसी (DOGE) आणि ऑफिस ऑफ मॅनेजमेंट अँड बजेटने काही कागदपत्रे तपासली. यामध्ये बायडेन यांनी कंडोम वितरित करण्यासाठी एवढा मोठा निधी दिल्याचे लक्षात आले होते. तो निधी रोखण्यात आला आहे.
हा पैसा करदात्यांचा होता. तो गाझामध्ये कंडोम वाटण्यासाठी खर्च केला जाणार होता. या वायफळ खर्च थांबविण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हमास या कंडोमचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याची वृत्ते येत आहेत. या कंडोममध्ये गॅस भरून ते फुग्यांसारखे इस्रायलच्या दिशेने जात असलेल्या हवेत सोडले जात आहेत.
ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारावेळी आपण निवडून आल्यास व्यापक बदल करणार असल्याचे म्हटले होते. यासाठी एक समिती नेमून त्यात अब्जाधीश एलन मस्क आणि विवेक रामास्वामी यांची नेमणूक करण्यात आली आहे. आता हे दोघेच अमेरिकेचा पैसा कुठे वायफळ खर्चिला जातो, तो कसा रोखता येईल हे पाहणार आहेत.
मस्क यांना शंका...बायडेन सरकार देत असलेले कंडोम हे मॅग्नम कंपनीचे आहेत. ते त्याच कंपनीचे का आहेत, असा सवाल मस्क यांनी उपस्थित केला आहे. कारण मॅग्नम कंपनी मोठ्या आकाराचे कंडोम बनविते. यामुळ त्यात जास्तीचा गॅस भरला जातो, असे मस्क यांनी म्हटले आहे.