शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आईसाठी तो बनला स्पायडरमॅन, चढला आग लागलेल्या इमारतीचे 15 मजले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:27 AM

इमारतीला आग लागल्याने आत अडकून पडलेल्या आईला वाचवण्यासाठी एका तरुणाने आपला जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे.

वॉशिंग्टन - आई आणि मुलांच्या नात्याचं वर्णन शब्दात करता येऊ शकत नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. तसेच काही मुलांचेही आपल्या आईवर जिवापाड प्रेम असते. असाच एक प्रकार अमेरिकेत समोर आला आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फीया येथे इमारतीला आग लागल्याने आत अडकून पडलेल्या आईला वाचवण्यासाठी एक तरुण जीव धोक्यात घालून इमारतीच्या भिंतीवरून चक्क 15 मजले चढून वर गेला. दरम्यान, ही घटना एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जर्मेन असे या आईसाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फिलाडेल्फीयामधील वेस्टपार्क अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याने अनेक जण इमारतीत अडकून पडले होते. याच इमारतीत जर्मेनची आई राहत होती. त्यामुळे आग लागल्यानंतर जर्मेनला त्याच्या आईची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्याने इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे असलेल्या पोलिसांनी त्याला इमारतीत प्रवेश करण्यापासून रोखले. 

मात्र आईच्या काळजीने व्याकूळ झालेल्या जर्मेनने इमारतीच्या भिंतीवरून वर चढत जाण्याचा निर्णय घेतला. नंतर तो बाहेरून चढत 15 व्या मजल्यापर्यंत पोहोचला. तेथे आईला सुखरूप पाहिल्यानंतर त्याला हायसे वाटले. तसेच आपण ठीक असून, आता आग नियंत्रणात आली आहे, असे आईने त्याला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आपणास पाहिल्यास आपल्याला अटक करतील म्हणून जर्मेनने पुन्हा इमारतीच्या भिंतीवरून खाली उतरण्याचे ठरवले. त्यानंतर तो इमारतीच्या भिंतीवरून खाली उतरला. विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची संरक्षक उपकरणे किंवा दोरखंड यांचा वापर न करता जर्मेन इमारतीवर चढला आणि खाली उतरला.  खाली उतरल्यानंतर पोलीस अटक करतील, असे त्याला वाटले होते. मात्र परिस्थिती पाहून पोलिसांनी जर्मेनला केवळ ताकीद  देत सोडून दिले. इमारतींचे बांधकाम करणारा कामगार म्हणून काम करत असल्याने जर्मेनला इमारतींच्या बांधकामाबाबत माहिती होती. त्यामुळेच आपल्याला इमारतीवर सुखरूपरीत्या चढून खाली उतरता आले, असे जर्मेनने सांगितले. 

टॅग्स :United StatesअमेरिकाJara hatkeजरा हटके