शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

‘तो’ फक्त विचार करतो, लगेच तसं घडतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:10 AM

जगात असे किती अभागी लोक आहेत, ज्यांना नैसर्गिक किंवा अपघातानं झालेल्या छोट्याशा इजेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जगात लाखो अंध लोक आहेत. अनेकांना अपंगत्व आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य जगण्यावरच त्याचा विपरीत परिणाम होतो.

जगात असे किती अभागी लोक आहेत, ज्यांना नैसर्गिक किंवा अपघातानं झालेल्या छोट्याशा इजेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जगात लाखो अंध लोक आहेत. अनेकांना अपंगत्व आहे. त्यामुळे त्यांच्या सर्वसामान्य जगण्यावरच त्याचा विपरीत परिणाम होतो. यात या लोकांची काहीच चूक नाही, पण त्यामुळे अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागतो आणि त्यामुळे ते मागे पडतात. जगण्यापासून ते मरणापर्यंत त्यांना अनंत यातना सोसाव्या लागतात. 

अलीकडे वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहायानं त्यांच्या अडचणी तशा कमी झाल्या, पण तरीही त्यांच्या मागचं शुक्लकाष्ठ कधी थांबलं नाही, ते नाहीच! पण सध्या तंत्रज्ञान ज्या वेगानं भरारी घेत आहे, ते पाहता, अनेक लोकांना आता सर्वसामान्य आयुष्य जगता येऊ शकेल, अशी आशा जागृत झाली आहे. इलॉन मस्क अनेक कारणांनी चर्चेत असतात, पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते अगदी नवनवीन प्रयोगही सातत्यानं करीत असतात. मस्क यांची स्टार्टअप कंपनी ‘न्यूरालिंक’नं याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात एका रुग्णाच्या मेंदूत न्यूराचिप बसवली होती. या पेशंटला आठ वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता आणि त्याला अर्धांगवायू झाला होता. त्याचं चालणं-फिरणंही बंद झालं होतं. साध्या साध्या गोष्टींसाठीही त्याला इतरांवर अवलंबून राहावं लागत होतं. नोलँड अरबॉघ त्याचं नाव. 

या नोलँडनं ‘एक्स’वर नुकतीच एक पोस्ट टाकली. याच पोस्टमुळे सध्या जगभरात नोलँडचं, पण त्याहीपेक्षा इलॉन मस्क आणि त्यांच्या न्यूरालिंकचं नाव गाजतं आहे. तुम्ही म्हणाल, ‘एक्स’वर पोस्ट टाकली, त्यात काय एवढी फुशारकी? किंवा मग ती पोस्ट वादग्रस्त होती का? किंवा त्यात त्यानं काही जाहीर केलं होतं का? - तर तसं काहीही नाही, तरीही ही पोस्ट, नोलँडची ती कृती गाजली, कारण ही पोस्ट लिहिताना त्यानं आपल्या कोणत्याही अवयवाचा दृष्य स्वरूपात वापर केला नव्हता! म्हणजे त्यानं ही पोस्ट हातानं टाइप केली नव्हती, तोंडानं बोलून ती पोस्ट स्क्रीनवर उमटवली नव्हती किंवा इतर कोणाची मदतही घेतली नव्हती. नोलँडनं एक्सवर जी पोस्ट केली ती त्यानं फक्त मनातल्या मनात विचार करून त्याद्वारे पोस्ट केली होती! म्हणजेच आपल्याला काय मजकूर पोस्ट करायचा आहे, याचा त्यानं फक्त मनातल्या मनात विचार केला! झालं, तो मजकूर स्क्रीनवर टाइप झाला आणि एक्सवर पाठवलाही गेला!

त्याही पुढची गोष्ट म्हणजे नाेलँडनं ऑनलाइन चेस खेळतानाचा एक व्हिडीओही शेअर केला. त्या पोस्टमध्ये तो म्हणतो, चेस (बुद्धिबळ) हा माझा आवडता खेळ, पण तो खेळणंही मी सोडून दिलं होतं, कारण मला आता खेळताच येत नव्हतं. पण मेंदूत न्यूराचिप बसविल्यानंतर मी आता पुन्हा चेस खेळू शकतोय! मी आता फक्त विचार करतो आणि तसं घडतं! 

नोलँड, इलॉन मस्क आणि न्यूरालिंक यांची सध्या जगभरात चर्चा आहे ती यामुळेच! कारण पुढच्या एका नव्या संशोधनाची, लक्षावधी अपंग लोकांना वरदान ठरण्याची ही नांदी आहे. अर्थात आत्ता हा प्रयोग फक्त चाचणीच्या स्वरूपात आहे. हा प्रयोग जर संपूर्णपणे यशस्वी झाला तर ज्यांचा मेंदू विकलांग झाला आहे, ज्यांना संवाद साधता येत नाही, त्यांना इतरांशी ‘बोलणं’ सहजशक्य होईल. अर्धांगवायूमुळे जे रुग्ण हिंडू-फिरू शकत नाहीत, तसंच ज्यांना अंधत्व आहे, जे काहीच पाहू शकत नाहीत, असे जगातले कोट्यवधी लोक आता संगणकाच्या मदतीनं  ‘पाहू’ शकतील, त्यांना ‘दृष्टी’ प्राप्त होईल! ते लिहू, बोलू, ‘चालू’ शकतील! आणि संगणकही हाताळू शकतील! या अर्थानं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. संगणक आणि ती व्यक्ती यांच्यातली ही एक प्रकारची टेलिपथी आहे.

न्यूरालिंक कंपनीनं या चिपचं नाव ‘लिंक’ ठेवलं आहे. ही चिप म्हणजे नाण्याच्या आकाराचं एक छोटंसं उपकरण आहे. मानवी मेंदू आणि संगणक किंवा मोबाइल यांच्यात या चिपद्वारे थेट संवाद साधला जातो. रुग्णांसाठी ही चिप देवदूत ठरण्याची शक्यता आहे.

मेंदूतील चिप बाहेरून होईल चार्ज!समजा, एखाद्याला अर्धांगवायू झालेला आहे. अशा व्यक्तीच्या मेंदूत ही चिप बसवली, तर नुसत्या विचारांनी तो आपल्या संगणकाचा माऊस, कर्सर सरकवू शकेल. मेंदूच्या आदेशानुसार आपण आपले हात, पाय हलवतो, तसं नुसत्या विचारांनी ती व्यक्ती आता आपल्या इच्छा प्रत्यक्षात आणू शकेल! ही चिप मेंदूत इम्प्लान्ट करण्यासाठी रोबोटिक प्रणाली वापरण्यात येईल. पण मेंदूतली ही चिप जोपर्यंत चार्ज असेल, तोपर्यंतच काम करेल. - अर्थात त्यासाठी वायरलेस चार्जरही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मेंदूतल्या चिपची बॅटरी बाहेरूनच चार्ज होईल!

टॅग्स :scienceविज्ञानHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय