तेहरान : इराणमधील अरॅट होस्सेनी या तीन वर्षांच्या जिम्नॅस्टिक्स मुलाने आपल्या घराची १० फूट उंचीची भिंत स्पायडरमॅनसारखी चढून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे चित्रीकरण झाले असून, सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दहा फूट उंचीची भिंत काहीही आधार न घेता चढून जाण्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा त्याने या चढण्यात अडथळा होऊ दिला नाही आणि तो भिंतीला चिकटून चढत गेला. चढताना त्याने कशाचाही आधार घेतला नाही. तो चढत-चढत छतावर गेला व तेथील फटीत अडकून पडलेला टेनिसचा चेंडू त्याने अलगद उचलला. त्याचे पालक मोहमद आणि फातेमाह यांनी अरॅटला जिम्नॅस्टिक्समधील आव्हाने स्वीकारण्यास मोठे प्रोत्साहन दिले. व्यायामांमुळे मुलांमधील गुणवत्ता खुली होते आणि त्यांच्यातील चिकाटी व धाडस विकसित होते, असे त्याच्या वडिलांनी म्हटले. अरॅटने डम्बेल्सची कसरतही त्याच्या इन्स्टागॅ्रम वाहिनीवर अपलोड केली.
दहा फूट भिंत तो पटापट चढला
By admin | Published: April 05, 2017 4:54 AM