बिजिंग - कुत्र्याच्या पिल्ल्याबरोबर खेळायला आणि वेळ घालवायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळेच प्रत्येकजण कुत्र्याच्या लहान पिलाकडे आकर्षित होतात आणि घरी अणतात. पण विचार करा, जर आपण एखाद्याने कुत्र्याचे पिल्लू म्हणून आणले आणि ते जर जनावर निघाले तर? होय..चीनमध्ये असा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने कुत्र्याचे पिल्लू समजून घरी आणलेलं अस्वल निघालं.
न्यू चायना टीव्हीच्या वृत्तानुसार, एका व्यक्तीला 2015मध्ये डोंगरामध्ये एक काळ्या रंगाचे पिल्लू भटकताना दिसले. त्याने त्या भटकत असलेल्या पिल्ल्याला कुत्र्याचे पिल्लू समजून घेऊन आला. त्या पिल्ल्याला तो दररोज दूध पाजत असे आणि दररोज खाण्याकडे तो जातीने लक्ष घालत होता. असे काही दिवस सुरु असताना अचानक एकदिवशी ते पिल्लू दोन पाय चालत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याच्या पायाखालील जमीनच सरकली. तो अस्वस्थ झाला. कारण ते पिल्लू फक्त आठ महिन्याचे होते अन् त्याचे वजन 80 किलो आणि लांबी 2 मीटर होती. त्यावेळी त्या व्यक्तीला समजून चुकले, की आपण आणलेलं पिल्लू कुत्र्याचे नसून अस्वलाचे आहे.
पाहा व्हिडीओ -
त्याला जेव्हा समजले की ते पिल्लू अस्वलाचे आहो तेव्हापासून ते पिंजऱ्यात आहे. गेल्या महिन्यात स्थानिक वनविभाला या अस्वलाची माहिती समजली तेव्हा त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. वन विभागाने त्याला जंगलात पाठवण्याची तयारी केली आहे.