जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने सांगितले की, अनेक प्रयत्नांनंतरही जगभरातील ५ अब्ज लोक हे अजूनही ट्रान्श फॅटच्या सेवनामुळे जीवघेण्या हृदयासंबंधीच्या आजारांचा सामना करत आहेत. डब्ल्यूएचओने ही माहिती विषयुक्त पदार्थांना लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून रोखण्यात अपयशी ठरलेल्या देशांना आवाहन करताना दिली आहे.
डब्ल्यूएचओने २०१८ मध्ये कारखान्यामध्ये तयार होणारे फॅटी अॅसिड २०२३ पर्यंत जगभरातून संपुष्टात आणण्याचे आवाहन केले होते. फॅटी अॅसिडमुळे दरवर्षी सुमारे ५ लाख लोकांनी आपला जीव गमावल्याचे डब्ल्यूएचओच्या निदर्शनास आले होते.
संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने सांगितलं की, २.८ अब्ज लोकांची एकूण लोकसंख्या असलेल्या ४३ देशांनी फॅटी अॅसिडला नष्ट करण्यासाठी उत्तर धोरण आखले आहे. मात्र अजूनही जगातील पाज अब्जांहून अधिक लोक या धोकादायक विषाचं सेवन करत आहेत.
त्यांनी सांगितले की, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया हे त्या देशांपैकी आहेत, ज्यांनी यासंदर्भात धोरण आखलेलं नाही. तिथे ट्रान्स फॅट हे हृदयरोगाचा धोका अधिक आहे.
ट्रान्स फॅट म्हणजे एक प्रकारचे अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते. त्यामुळे आरोग्याला नुकसान होत नाही. मात्र जेव्हा ते कारखान्यात तयार करून अन्नपदार्थ म्हणून वापरले जाते. तेव्हा ते सौम्य विष बनते. ट्रान्स फॅट हे वनस्पती तेल आणि हायड्रोजन यांचे मिश्रण करून तयार केले जाते.