ऑस्ट्रेलियात आज एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला, या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका हॉटेलच्या छतावर हे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन अपघात झाला. हेलिकॉप्टरच्या पायलटचा यात मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर हॉटेल परिसरात गोंधळ सुरू झाला, हॉटेल रिकामे करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ऑस्ट्रेलियातील डबल ट्री हॉटेलच्या छतावर झाला. हे हॉटेल नॉर्दर्न सिटी, केर्न्सच्या हिल्टन परिसरात आहे. अपघातानंतर खबरदारी म्हणून इमारत रिकामी करण्यात आली असून तेथे उपस्थित असलेल्या लोकांना कोणतीही दुखापत झाली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बांगलादेशातील एक बेट दिले नाही, सत्ता गेली; अमेरिकेने कट रचल्याचा शेख हसीना यांचा आरोप
नेमकं काय घडलं?
या अपघाताचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये हॉटेलच्या छताला आग लागल्याचे दिसत आहे. आतापर्यंत वैमानिकाच्या मृत्यूशिवाय अन्य कोणत्याही जीवितहानीबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. हेलिकॉप्टर दुहेरी इंजिन होते आणि त्याचे दोन्ही प्रोपेलर थांबले होते, त्यानंतर ते हॉटेलच्या छताला आदळून क्रॅश झाले.
तीन दिवसांपूर्वी ब्राझीलमध्ये एक मोठा विमान अपघात झाला होता. या अपघातात विमानात ६२ लोक होते, या सर्वांचा मृत्यू झाला. ब्राझीलमधील साओ येथे ही दुर्घटना घडली असून तेथे एक प्रवासी विमान अचानक कोसळले.
व्हॅलिन्होस शहराच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, या अपघातात कोणी वाचले नाही. एका घरावर हे विमान कोसळले. घरात त्यावेळी कोणी नसल्याने घरातील कोणी व्यक्ती दगावलेली नाही. घराचेही नुकसान झाले आहे.
एटीआर-७२ हे छोटेखानी विमान होते. पराना राज्यातील कास्केव्हेलहून ते साओ पाऊलो येथे ते जात होते. विन्हेडो येथे विमान क्रॅश झाले. विमानात ५८ प्रवासी आणि ४ पायलट, क्रू मेंबर होते. ग्लोबोन्यूजवरील फुटेजमध्ये विमान वेगाने खाली पडत असल्याचे दिसत आहे.