ऑनलाइन लोकमतमेलबर्न, दि. 11 - क्रिकेटपटू फिलीप ह्युज याचा मैदानावरच झालेला मृत्यू आॅस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला (सीए) प्रचंड वेदना देणारा ठरला. त्यामुळे आता खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता फलंदाजांनी मैदानावर हेल्मेट वापरायलाच हवे, असा नियम कठोर केला आहे. डेविड कर्टेन यांनी बुधवारी परिक्षण शिफारसी सादर केल्या. त्यानंतर सीएने प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात फलंदाजांसोबतच यष्टिरक्षक आणि विकेटजवळ उभ्या राहणाऱ्या क्षेत्ररक्षकाला हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. सीएनुसार, सराव आणि सामन्यादरम्यान वापरण्यात येणारी सर्व हेल्मेट ही ब्रिटिश नियमांना पूर्ण करणारी असायला हवीत. सीएचे प्रमुख जेम्स सदरलॅँड म्हणाले की, ह्युजचा विचार डोक्यात येत नाही, ही केवळ एका दिवसाची गोष्ट नाही. ही गोष्ट ह्युजला परत आणू शकत नाही किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे दु:खही कमी करू शकत नाही त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची काळजी घेता येईल. त्यासाठी हेल्मेट वापरणे हा नियम कठोर करण्यात आला आहे.
फलंदाजांना हेल्मेटसक्ती, आॅस्ट्रेलियाचा कठोर नियम
By admin | Published: May 11, 2016 11:31 PM