ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 13 - उद्या असलेला व्हॅलेंटाइन डे जल्लोषात साजरा करण्यासाठी जगभरात प्रेमवीरांनी जय्यत तयारी केली आहे. पण पाकिस्तानमधील एका उच्च न्यायालयाने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याला स्थगिती दिली आहे.
व्हॅलेंटाइन डे हा इस्लामविरोधी असल्याचे कारण देत इस्लामाबादमधील उच्च न्यायालयाने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यावर बंदी घातली आहे. इस्लामाबाद हायकोर्टात या खटल्याची सुनावणी करत असलेले न्यायमूर्ती शौकत अझीज यांनी माहिती मंत्रालय, इस्लामाबाद उच्चायोग आणि पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेशन अॅथॉरिटी (पेमरा) यांना या आदेशाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे.
अब्दुल वाहिद नावाच्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला आहे. समाजात आणि सोशल मीडियावर सुरू असलेला व्हॅलेंटाइन डेचा प्रचार आणि प्रसार इस्लामविरोधी असल्याचे सांगत वाहिद याने व्हॅलेंटाइन डेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तसेच सार्वजनिकपणेही व्हॅलॆंटाइन डे साजरा करण्यावर बंदी आणण्याची मागणी त्याने केली होती.