मॉस्को- हिवाळ्यात आपल्याकडे ८ ते १० डिग्री सेल्सिअस तापमान असले तरी अक्षरश: हुुडहुडी भरते. मात्र रशियातील याकूत्स्क या ठिकाणी तापमान उणे ५० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते आणि तेथील लोक अशा तापमानातही राहतात. रशियाच्या दक्षिण भागात हे शहर लेना नदीकिनारी वसलेले आहे. त्यामुळेच याला पोर्ट सिटी म्हणूनही संबोधले जाते. या शहराची लोकसंख्या २,५०,००० एवढी आहे. या शहराची स्थापना १६३२ मध्ये झाली होती. १८८० आणि १८९० मध्ये येथे मिळालेल्या सोने आणि खनिज पदार्थांच्या भांडाराने या शहराला महत्व प्राप्त झाले. या शहराचा विस्तार झाला. साधारणत: १२ मे ते १० सप्टेंबर या काळात येथे उन्हाळा असतो. या काळात येथील तापमान १२ डिग्री सेल्सिअस असते. येथे हिवाळा १८ नोव्हेंबर ते १ मार्चपर्यंत असतो.
येथे असते उणे ५० तापमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 3:48 AM