तेल अवीव : इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या अनपेक्षित हल्ल्याच्या २४ तासांनंतर रविवारी लेबनानमधील दहशतवादी गट हिजबुल्लानेही इस्रायलमधील तीन ठिकाणी हल्ला केला, यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे हा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अलीकडच्या दशकांतील इस्रायलवरील हा सर्वांत भीषण हल्ला आहे.
गाझामध्ये किमान ३१३ लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यामुळे इस्रायलमधील मृतांची संख्या ६००वर पोहोचली असून, इस्रायलच्या लष्कराने ४०० दहशतवाद्यांना ठार केले आहे. यात अनेक दहशतवाद्यांना पकडण्यात आले असून, रस्त्यांवर सगळीकडे मृतदेह दिसून येत आहेत. गाझामधील सीमेजवळ इस्रायली हल्ल्यांपासून वाचण्यासाठी रहिवाशांनी आपली घरे सोडली आहेत.
इस्रायलमध्ये ३,५०० पेक्षा अधिक रॉकेटने हल्ला, ६०० नागरिक ठार, २,००० पेक्षा अधिक जखमी
गाझा उद्ध्वस्त -४२६ ठिकाणी हल्ले, ३१३ नागरिकांसह २० मुले ठार, २,०००जखमी,
एअर इंडियाची उड्डाणे रद्दएअर इंडियाने इस्रायलला जाणारी सर्व उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहेत. इस्रायलमध्ये एक हजार विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक, हिरे व्यापारी राहतात.
अडकलेली अभिनेत्री परतली : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा फिल्म फेस्टिव्हलसाठी इस्रायलला गेली होती. तिच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र, भारतीय दूतावासाच्या मदतीने ती रविवारी सकाळी सुरक्षितरीत्या मुंबईत परतली.
सोन्यात ₹ १,१०० वाढयुद्धामुळे सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी ६०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ५८ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. चांदी मात्र ६९,५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर आहे.
नेपाळचे १० विद्यार्थी ठारअनेक भारतीय विद्यार्थी युद्धामुळे भयभीत झाले आहेत. त्यांना भारतात सुरक्षितपणे आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे विदेश राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे. नेपाळमधील १० विद्यार्थी ठार झाले आहेत.