शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 7:07 PM

इस्रायलच्या सीमेजवळ गाझा येथून हिज्बुल्ला आणि हमासच्या सैनिकांनी अनेक रॉकेट्स डागली

Hezbollah and Hamas attacked Israel: इस्रायल गेल्या काही महिन्यांपासून विविध आघाड्यांवर लढत आहेत. तशातच हिज्बुल्ला आणि हमास यांनी मिळून सोमवारी इस्रायलला लक्ष्य केले. क्षेपणास्त्र आणि रॉकेटचा वापर करून झालेल्या हल्ल्यात १० जण जखमी झाले असून अनेक वाहने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. हमासने हे दाखवण्याचा प्रयत्न केला की ते अजूनही इस्रायलविरुद्ध लढत आहेत. तेल अवीवच्या इस्रायलच्या सीमेजवळ गाझा येथून त्याच्या सैनिकांनी अनेक रॉकेट डागले. या हल्ल्यानंतर सायरन वाजू लागले आणि लोक बंकरच्या दिशेने धावताना दिसले.

इस्रायलचे तिसरे मोठे शहर हैफा येथे हिजबुल्लाने अनेक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स डागली. हैफाच्या दक्षिणेस असलेल्या इस्रायली लष्करी तळावर मध्यम पल्ल्याच्या फादी-1 क्षेपणास्त्रांनी मारा केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. त्याचवेळी, मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हैफा येथे दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि ६५ किलोमीटर दूर असलेल्या तिबेरियास शहरावर पाच रॉकेट्स पडली.

याआधी इस्रायलने म्हटले होते की, आमच्या युद्ध विमानांनी बेरूतमधील हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयाशी संबंधित लक्ष्यांवर हल्ला केला आहे. या लक्ष्यांमध्ये गुप्तचर माहिती गोळा करणारी यंत्रणा, कमांड सेंटर आणि इतर अनेक इमारतींचा समावेश आहे. बेरूतमधील हिजबुल्लाह शस्त्रास्त्रांची दुकानेही नष्ट करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.

इस्रायलसह जगभरात शोक पाळण्यात आला

सोमवारी हमासच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इस्रायलसह अनेक देशांमध्ये शोकसभांचे आयोजन करण्यात आले होते. इस्रायलमधील लोक स्मशानभूमीत आले आणि हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ स्मारकाच्या ठिकाणीही जमले. यावेळी अनेक जण आपल्या प्रियजनांची आठवण करून रडताना दिसले. हमासने ज्या लोकांना आतापर्यंत ओलीस ठेवल्याचा दावा केला होता, त्यांची सुटका करण्याची मागणीही करण्यात आली. युद्धात शहीद झालेल्या जवानांनाही मानवंदना देण्यात आली. त्याचबरोबर ब्रिटन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि ग्रीसमध्येही लोकांनी मोर्चे काढले.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धwarयुद्ध