शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
2
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
3
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
4
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
5
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
6
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
7
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
8
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
9
एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
10
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
11
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
12
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
13
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
14
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
15
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
16
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
17
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
18
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
19
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:26 AM

Hezbollah vs Israel, Fadi 3 Missile: हिज्बुल्लाने इस्रायलच्या लष्करी तळावर फादी-३ मिसाइलचा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

Hezbollah vs Israel, Fadi 3 Missile: इस्रायली सैन्याने लेबनानमधील हिजबुल्लाच्या सैनिकांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ५०० हून अधिक लोक मारले गेले. इस्रायलच्या एअरस्ट्राइकनंतर हिजबुल्लानेही  इस्रायलवर निशाणा साधला आहे. इस्रायलविरुद्ध नवीन रॉकेट वापरण्याची घोषणा त्यांनी केली आहे. हिजबुल्लाने एका हल्ल्यात नवीन रॉकेट फादी-3 वापरल्याचे म्हटले आहे. त्यांनी इस्रायली लष्करी तळाला टार्गेट केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फादी-3 रॉकेट किती प्राणघातक आहे याबाबत हिजबुल्लाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इराणची वृत्तसंस्था मेहरने दिलेल्या माहितीनुसार, या रॉकेटच्या फादी-२ आवृत्तीमध्ये १७० किलो वजनाचे वॉरहेड (पुढची बाजू) होते. त्याची रेंज १०० किलोमीटर होती. हे फादी-१ पेक्षा जास्त शक्तिशाली रॉकेट होते. फादी-१ मध्ये ८३ किलो वजनाचे वॉरहेड होते. त्याची रेंज ७० किलोमीटर होती. त्यामुळे अद्ययावत फादी-३ मध्ये सुमारे २३० किलो वजनाचे वॉरहेड आणि सुमारे १२५ किमी रेंज असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, सोमवारी पहाटे लेबनानमध्ये हवाई हल्ले सुरू झाले होते. यामध्ये आतापर्यंत ५५८ लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये ५० मुले आणि ९४ महिलांचा समावेश आहे. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी मंगळवारी सांगितले की, या हल्ल्यांमध्ये १,८३५ लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये चार वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Israelइस्रायलBlastस्फोटIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध