Israel strikes Hezbollah's headquarters in Beirut : इस्रायलने लेबनॉनमधील बेरूतमध्ये आणखी एक मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख नसराल्लाह सकाळी सहा वाजता मुख्यालयात पोहोचेल, अशी माहिती शुक्रवारी इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार, इस्रायलने हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर हल्ला केला.
या हल्ल्यात नसराल्लाह आणि त्याच्या भावासह हिजबुल्लाचे अनेक कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी होऊ शकली नाही. यासंदर्भात हिजबुल्लाह लवकरच एक निवेदन जारी करेल. या हल्ल्याच्या वेळी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू न्यूयॉर्कमध्ये उपस्थित होते. ते इस्रायलला परत असून तेल अवीवमध्ये सेल्टर त्वरित प्रभावाने उघडण्याची घोषणा केली आहे.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार इस्रायलने या हल्ल्यापूर्वी अमेरिकेला माहिती दिली होती. हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच ही बातमी देण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी न्यूयॉर्कमधूनच हल्ल्याला मंजुरी दिली. आयडीएफ चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्जी हलेवी यांनी हा हल्ला केल्याबद्दल लष्कराचे कौतुक केले.
संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी अंडरग्राउंड कमांड रूममधून हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर झालेला हल्ला पाहिला. त्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. यासंबंधीचे फोटोही समोर आले आहेत. त्यामध्ये आयडीआफ आयडीएफ चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल हर्जी हलेवी, आयएएफ चीफ मेजर जनरल तोमर बार आणि इतर अधिकारी दिसून येत आहेत.
इस्रायली गुप्तचरांचा दावा आहे की, त्यांना नसराल्लाह मुख्यालयात आल्याची माहिती मिळाली होती. यानंतर आयडीएफने बेरूतमधील मुख्यालयावर हल्ला केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संयुक्त राष्ट्रात भाषणानंतर लगेचच हा हल्ला करण्यात आला. यामध्ये हिजबुल्लाहचे किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप हिजबुल्लाहकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
३० किलोमीटरपर्यंत हादराहिजबुल्लाहच्या अल-मनार टीव्हीने सांगितले की, या स्फोटात चार इमारती जमीनदोस्त झाल्या. हा हल्ला इतका शक्तिशाली होता की, त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि बेरूतच्या उत्तरेला सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील घरे हादरली. सायरन वाजवत रुग्णवाहिका स्फोटाच्या ठिकाणी जाताना दिसल्या. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोकं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.