इस्त्रायल आणि हिजबुल्लाह या दोन देशात तणाव वाढला आहे. पेजर आणि वॉकी-टॉकी हल्ल्यांनी हिजबुल्लाला धक्का दिला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलविरुद्ध युद्धाच्या नव्या टप्प्याची घोषणा केली आहे. बिकट परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. इस्रायलच्या धमक्यांनी झुकणार नाही. हिजबुल्लाहचा उपप्रमुख नईम कासिम याने युद्धाच्या नव्या टप्प्याची घोषणा केली आहे.
'आम्ही युद्धाच्या नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. त्याचे नाव ओपन अकाउंटिंग आहे. गाझामधील युद्धबंदीमुळेच सीमेपलीकडून होणारे हल्ले थांबतील, असं हिजबुल्लाहचे उपप्रमुख नइम कासेम यांनी म्हटले आहे.
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
'उत्तर इस्रायलमधील विस्थापित लोकांना त्यांच्या घरी परत पाठवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. वृत्तानुसार, कासिमने इस्रायलला सांगितले की, "गाझामध्ये जा आणि युद्ध थांबवा आणि आम्हाला धमक्यांची गरज नाही. आक्रमणाला कसे प्रत्युत्तर द्यायचे हे आम्ही ठरवणार नाही. आम्ही युद्धाच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे."
कासेम म्हणाले की, इस्रायलने आमच्याविरुद्ध तीन मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यांनी हद्द ओलांडली आहे. धमक्या आम्हाला थांबवणार नाहीत. आम्ही सर्वात धोकादायक शक्यतांना देखील घाबरत नाही. लष्करी शक्यतांचा सामना करण्यासही सर्व सज्ज आहोत.
मागील शुक्रवारी इस्रायलने हिजबुल्लाच्या रदवान ब्रिगेडच्या बैठकीदरम्यान हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हिजबुल्लाह कमांडर इब्राहिम अकील आणि महमूद हमद यांच्यासह एकूण ५० जणांना प्राण गमवावे लागले. रविवारी नईम कासेम दक्षिण बेरूतमध्ये इब्राहिम अकील आणि महमूद हमद यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते.
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले
पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल लपवून हिजबुल्लाचे कंबरडे मोडणाऱ्या इस्रायलवर हिजबुल्लाने मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्त्रायलची आयर्न डोम सिस्टिम सपशेल फेल ठरली असून नागरिकांना बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला आहे.