शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:26 PM

Israel Hezbollah War : इस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला.

Israel Hezbollah War : तेल अवीव : इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर  मोठा हवाई हल्ला केला. दरम्यान, इस्त्रायली लष्कराने दावा केला आहे की, बेरूतच्या उपनगरातील एका अपार्टमेंट इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा ड्रोन कमांडर ठार झाला आहे. मोहम्मद हुसेन सुरूर असे ठार झालेल्या कमांडरचे नाव आहे. मात्र, हिजबुल्लाहने इस्रायलच्या दाव्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बेरूतच्या उपनगरात हवाई हल्लाइस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठा हवाई हल्ला केला. लेबनॉनच्या हिजबुल्लाह गटाच्या टीव्ही स्टेशनने बेरूतच्या उपनगरात इस्रायली हवाई हल्ल्याचे वृत्त दिले आहे. अल-मनार टीव्हीने मात्र हल्ल्याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, इस्त्रायली लष्कराने बेरूतच्या दक्षिणेवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.

यापूर्वी मिसाइल युनिटचा वरिष्ठ कमांडर ठारइस्रायली लष्कराने लेबनानमधील हिजबुल्लाहच्या सैनिकांवर प्राणघातक हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये ५०० हून अधिक लोक मारले गेले.दोन दिवसांपूर्वी इस्त्रायली लष्कराने अशाच हल्ला केला होता. त्यात हिजबुल्लाहच्या मिसाइल युनिटचा वरिष्ठ कमांडर ठार झाला होता.

सरकारमधून बाहेर पडण्याची धमकीदुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारमधील एका घटक पक्षाने हिजबुल्लाहसोबत कायमस्वरूपी युद्धविराम झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. ज्यू पॉवर पक्षाचे प्रमुख इटामार बेन-ग्वीर यांनी तात्पुरता करार झाल्यास युतीबरोबरचे सहकार्य स्थगित करण्याची धमकी दिली. ते म्हणाले "तात्पुरती युद्धबंदी कायमस्वरूपी झाली तर आम्ही सरकारचा राजीनामा देऊ." 

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीयBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू