शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
3
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
4
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
5
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
6
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
7
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
8
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
9
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
10
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
11
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
12
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
13
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
14
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
15
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
16
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
17
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
18
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
19
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
20
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?

बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:45 PM

या हल्ल्याचा एक फोटोही समोर आला आहे, यावरून हिजबुल्लाहच्या धाडसीपणाचा अंदाज येऊ शकतो. नेतन्याहू यांच्या बेडरूमवर कशा पद्धतीने हल्ला झाला, हे फोटोवरून स्पष्ट होते.

इस्रायलचे हमास आणि हिजबुल्लाहसोबत सुरू असलेले युद्ध सातत्याने तीव्र होताना दिसत आहे. आता गेल्या शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. हिजबुल्लाहने थेट त्यांच्या घरावर ड्रोन हल्ला केला होता. मात्र यात त्यांना कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. हल्ल्या वेळी नेतान्याहू हे त्यांच्या निवासस्थानी नव्हते. 

दरम्यान, या हल्ल्याचा एक फोटोही समोर आला आहे, यावरून हिजबुल्लाहच्या धाडसीपणाचा अंदाज येऊ शकतो. नेतन्याहू यांच्या बेडरूमवर कशा पद्धतीने हल्ला झाला, हे फोटोवरून स्पष्ट होते. या हल्ल्यात त्याच्या बेडरूमच्या खिडकीचे नुकसान झाले आहे. यावरून स्पष्ट होते की, हिजबुल्लाहचा निशाना अगदी अचूक होता त्यांचे ड्रोन नेतन्याहू यांच्य बेडरूमपर्यंत पोहोचले होते. 

या हल्ल्यात बेंजामिन नेतन्याहू यांना इजा झाली नाही. मात्र, असा एखादा अचूक हल्ला भविष्यात झाला तर मोठे नुकसान होऊ शकते, अशी भीती इस्रायली यंत्रणांना वाटू लागली आहे. हे ड्रोन लेबनॉनमधून उडवण्यात आले होते, ते थेट बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाच्या बेडरूमच्या खिडकीवर धडकले. या ड्रोन हल्ल्यात घराच्या खिडकीचे कसे नुकसान झाले, हे संबंधित फोटोत दिसत आहे. ड्रोन हल्ल्यात खिडकीची काच फुटली आहे. मात्र,  ते आत जाऊ शकले नाही. कारण संबंधित काच अत्यंत मडजबूत होती आणि प्रोटेक्शनसाठी इतरही काही गोष्टी होत्या.

या हल्ल्यात कुणीही जखमी झालेले नाही. हल्ला झाला तेव्हा बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी निवासस्थानी नव्हते. या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने एक निवेदन जारी करत आमचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि थेट हल्ला केला, असे म्हटले आहे. या प्रकरणापासून इराणने दूर राहणे पसंत केले आहे. मात्र इस्रायलच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावर थेट आरोप केला आहे. हे काम इराणच्या एजंट्सनीच केले असल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलIranइराणwarयुद्ध