ऑनलाइन लोकमत -
दुबई, दि. ११ - जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत दुबईमध्येच उभारण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एम्मारने दिली आहे. एम्मार प्रॉपर्टी डेव्हलपर असून या इमारतीसाठी तब्बल सात हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे, तसंच बुर्ज खलिफापेक्षा ही इमारत उंच असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
इमारतीची उंची नेमकी किती असणार आहे याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. ही इमारत आमच्या शहरासाठी 2020ची भेट असेल असंही त्यांनी सांगितलं आहे. दुबईत 2020 मध्ये वर्ल्ड एक्स्पो ट्रेडिंग फेअर पार पडणार आहे त्याचवेळी या इमारतीच उद्घाटन करण्याची तयारी सुरु आहे. या इमारतीच्या रचनेचं काम स्पॅनिश-स्विस आर्किटेक्ट पाहत असून या इमारतीत रेस्टॉरंट आणि बुटीक हॉटेल्सदेखील असणार आहेत.
बुर्ज खलिफाची उंची 2700 फूट असून त्यासाठी नऊ हजार कोटींचा खर्च करण्यात आला होता. 2010 मध्ये या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं.