शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

हिजाब घालणाऱ्या आॅलिम्पिकपटूला अमेरिकेत रोखले विमानतळावर

By admin | Published: February 09, 2017 6:44 PM

अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम खेळाडूला लॉस एंजिलिस विमानतळावर अमेरिकेच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले.

ऑनलाइन लोकमतलॉस एंजिलिस, दि. 9 - हिजाब घालून आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम खेळाडूला लॉस एंजिलिस विमानतळावर अमेरिकेच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रोखले. जवळपास दोन तास ही खेळाडू अधिकाऱ्यांच्या ताब्यात होती.इब्तिहाज महम्मद असे या खेळाडूचे नाव असून, ती मागच्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या तलवारबाजी संघात होती. सायबर प्रकारात तिने कांस्य पदक जिंकले आहे. पदक जिंकणारी ती पहिली मुस्लिम अमेरिकन खेळाडू ठरली. इब्तिहाज म्हणाली, मला रोखण्यामागे काहीच कारण दिले नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्हिसाप्रकरणी लावलेल्या निर्बंधामुळे असा प्रकार घडला का, हे देखील कळेनासे आहे. पण माझ्या मते, मी मुस्लिम असल्याने असे घडले असावे. माझ्यासोबत असा प्रकार का घडला, हे माहीत नाही. पण मुस्लीम असणे हेच एकमेव कारण दिसते. माझे नाव अरबी भाषेत आहे. मी अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत आहे, शिवाय आॅलिम्पिकपटू आहे. तरीही पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे आपण समजू शकता. या घटनेवरून स्थानिकांमध्ये काहीही मतपरिवर्तन झाले नसल्याचे निष्पन्न होते.