शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

अपहृत पाकिस्तानी महिला पत्रकाराची सुखरूप सुटका, दोन वर्षे बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:46 AM

एका बेपत्ता भारतीय अभियंत्याच्या मदतीसाठी सातत्याने कोर्टात धाव घेऊन पाठपुरावा करणा-या पाकिस्तानच्या महिला पत्रकार झिनत शहजादी यांची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे.

लाहोर : एका बेपत्ता भारतीय अभियंत्याच्या मदतीसाठी सातत्याने कोर्टात धाव घेऊन पाठपुरावा करणा-या पाकिस्तानच्या महिला पत्रकार झिनत शहजादी यांची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे. त्या १९ आॅगस्ट २०१५ पासून त्या बेपत्ता होत्या.लाहोरमधील घरून कार्यालयाकडे आॅटोरिक्षाने जात असताना अज्ञात लोकांनी त्यांचे अपहरण केले होते. त्या डेली नई खबर आणि मेट्रो न्यूज टीव्ही चॅनेलच्या पत्रकार आहेत. भारतीय नागरिक हमीद अन्सारी यांच्या प्रकरणाचा त्या पाठपुरावा करीत होत्या. अन्सारी २०१२ मध्ये बेपत्ता झाले होते.बेपत्ता व्यक्ती चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश जावेद इक्बाल यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले की, पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेलगतच्या भागातून झिनत यांची गुरुवारी रात्री सुटका करण्यात आली. झिनत शहजादी (२६) या लाहोरमधील आपल्या कुटुंबीयांत सुखरूप पोहोचल्या आहेत. त्यांची सहीसलामत सुटका करण्यात आल्याचा आम्हाला आनंद वाटतो. त्या आता घरी सुखरूप पोहोचल्याने खूश आहेत, असे मानवी हक्क कार्यकर्त्या बीना सरवर यांनी म्हटले आहे. झिनत यांचे अपहरण झाल्यामुळे नैराश्यातून त्यांचा भाऊ सद्दाम याने मागच्या वर्षी आत्महत्या केली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Pakistanपाकिस्तानKidnappingअपहरण