ऑनलाइन लोकमत
वाशिंग्टन, दि. 19 - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत भाग घेतलेल्या हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची माफी मागितली होती.
वाशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत 2016 झालेल्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवारांच्या अपयशावर आधारित पुस्तक लिहिण्यात आले आहे. "शॅटर्ड : इनसाइट हिलरी क्विंटल डूम्ड कॅम्पेन" असे या पुस्तकाचे नाव असून यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत डेमोक्रेटिक पार्टीकडून उमेदवार असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पराभव होणार असल्याचे दिसून आल्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास व्हाईट हाऊसवर फोन केला होता आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची माफी मागितली होती. त्यावेळी काही राज्यांमधून मत मोजणी सुरु होती, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
दरम्यान, बराक ओबामा यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा फोन करुन त्यांना शुभेच्छा दिल्याचे या पुस्तकात म्हटले आहे.