वाशिंगटन, दि. १३ : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या आपल्या पराभवाला हिलरी क्लिंटन यांनी एफबीआयला जबाबदार धरले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुरब्बी राजकारणी हिलरी क्लिंटन यांचा अनपेक्षित पराभव करून अमेरिका या बलाढ्य राष्ट्राचे डोनाल्ड ट्रम्प ४५ वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. ईमेल खात्यांची एफबीयने केलेली पुन्हा पडताळणी माझ्या विजयात अडथळा ठरला असल्याची दावा हिलरी क्लिंटन यांनी केला आहे.
हिलरी क्लिंटन कडून हा दावा एका कार्यक्रामादरम्यान करण्यात आला आहे. निधी आणि देणग्या देणाऱ्याशी बोलताना त्या म्हणाल्या, माझा परभव मला मान्य आहे. माझ्या पराभवची कारणे अनेक आहेत. त्या म्हणाल्या माझ्यावर लावण्यात आलेल्या जेम्स कोमी यांच्या आरोपामुळे माझ्या विजयात अडथळे निर्माण झाले. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेक्रेटरी ऑफ स्टेट या पदावर असताना कार्यालयीन कामासाठी हिलरी यांनी केलेला खासगी ईमेलचा वापरही वादाचा मुद्दा महत्वाचा बनला होता. हिलरी यांनी त्यामुळं देशाची सुरक्षितता धोक्यात टाकल्याचाही आरोप करण्यात आला होता. मात्र एफबीआयने एक दिवस आधी क्लीन चीट दिल्याने हिलरी यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, त्यांना हिलरींना पराभवाला सामोरं जावं लागले. 'माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या खासगी ई-मेल सर्व्हरच्या वापराची तपासणी पूर्ण झाली असून हिलरींविरुद्ध कुठलेही गुन्हेगारी प्रकरण दाखल करता येणार नाही', असं एफबीआयचे संचालक जेम्स कोमी यांनी म्हटले होते. काय होता वाद - बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री होत्या. या काळात त्यांनी एका खासगी ईमेल सर्व्हरच्या माध्यमातून हजारो ईमेल केल्याचे समोर आले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्र्यांनी खासगी सर्व्हरचा वापर करणे गैर असल्याने क्लिंटन या अडचणीत सापडल्या. या प्रकरणी एफबीआयने तपासही केला. वॉशिंग्टन पोस्टचे राजकीय संपादक जोस ए डेलरियल यांनी ट्विटरवर हिलरी क्लिंटन यांच्या २०११ मधील ईमेलचा तपशील उघड केला होता. हिलरी यांनी अधिकृत कामासाठी त्यांनी सरकारी ईमेल वापरला नाही आणि त्या ईमेल्सचा साठादेखील सरकारी संगणकीय सर्व्हरवर करून देण्याऐवजी घरी खासगी सर्व्हरवर केला. त्यातून अनेक आरोप झाले आणि जेव्हा ईमेल्स या चौकशी समितीस देण्याची वेळ आली, तेव्हा जवळपास 33,000 ईमेल्स आधीच काढून टाकल्याचं सांगण्यात आलं.