अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक : २०१६ साठी डेमोक्रेटिक पक्षातून रिंगणात उतरण्यासाठी मोर्चेबांधणी, ओबामांचाही पाठिंबावॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी व विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या काळातील परराष्ट्रमंत्री, तसेच भारत-अमेरिका मैत्रीच्या समर्थक हिलरी रोधॅम क्लिंटन यांनी अमेरिकन अध्यक्षपदाच्या २०१६ च्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर करताच त्या रस्ता मार्गाने आयोवाला रवाना झाल्या असून, सोमवारीच प्रचाराचाही शुभारंभ केला आहे.आय अॅम रनिंग फॉर प्रेसिडेंट, एव्हरी डे अमेरिकन्स नीड ए चॅम्पियन, आय वॉन्ट टू बी दॅट चॅम्पियन असे ६७ वर्षांच्या माजी परराष्ट्रमंत्री क्लिंटन यांनी म्हटले आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव अगदी बळकट मानले जात आहे.अध्यक्ष बराक ओबामा यांनीही हिलरी यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट केला आहे. २००८ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचारात त्यांची पीछेहाट झाली होती. २००१ ते २००९ या कालावधीत न्यूयॉर्क मतदारसंघातून त्या सिनेटसाठी निवडून गेल्या. टिष्ट्वटरवर घोषणा हिलरी यांनी २०१६ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी टिष्ट्वटरवर जाहीर केली व त्यासोबत जोडलेल्या चित्रफितीत अमेरिकन नागरिकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी चॅम्पियन बनण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर लगेचच त्या आयोवा येथे प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क पाठविण्यासाठी रवाना झाल्या. (आयोवा राज्यातच अध्यक्षपदाचे पहिले कॉकस भरविले जाते.)मतदारांची प्रचारमोहिमआयोवा येथे हिलरी यांनी आपले कुटुंबियांसमवेतचे छायाचित्र दिले व आणखी छायाचित्रे देण्याचे आश्वासन दिले. ही प्रचारमोहीम मतदारांची आहे असे हिलरी यांनी म्हटले आहे. हा मतदारांचा वेळ आहे असे सांगत प्रचार मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.कुटुंब समर्थ तरच अमेरिका समर्थ अमेरिकन नागरिकांनी अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला आहे; पण अजूनही आर्थिक यश फक्त टॉपच्या लोकांसाठी आहे. आपण अशी अर्थव्यवस्था निर्माण करू जिथे तुम्ही स्वत:साठी काहीतरी करू शकाल. तुम्ही आघाडीवर असाल, कारण जर कुटुंब समर्थ असेल तरच अमेरिका समर्थ होईल. हजारांहून अधिक सभा हिलरी यांच्या समर्थकांनी आयोवामध्ये ९९ सभा आयोजित केल्या आहेत, तर अमेरिकेतील ५० राज्यांत हिलरी यांच्या हजाराहून अधिक सभा होणार आहेत, तसेच परदेशी राहणाऱ्या अमेरिकन मतदारांसाठी ५ देशांत सभा होणार आहेत. (वृत्तसंस्था)न्यूयॉर्कच्या महापौरांनी दिले नाही अनुमोदनन्यूयॉर्कचे महापौर मेयर डे ब्लासिओ यांनी हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीला अनुमोदन देण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी हिलरी या सर्वात योग्य उमेदवार आहेत असे त्यांनी म्हटले आहे; पण त्यांचा वास्तविक दृष्टिकोन जाणून घेतल्याखेरीज मी त्यांना पाठिंबा देणार नाही असे म्हटले आहे. रिपब्लिकन पक्षाची भूमिका अमेरिकेचे माजी अध्यक्ष व हिलरी यांचे पती बिल क्लिंटन यांचे पूर्वचरित्र हिलरी यांच्यासाठी अडचणीचे ठरेल असे दिसत आहे. बिल क्लिंटन यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप, अर्कान्सासचे गव्हर्नर असताना गाजलेले भूविकासाचे प्रकरण हिलरी यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. यात हिलरी यांचा काही दोष नाही, पण राजकीय आरोप-प्रत्यारोपात त्यांचा उल्लेख अपरिहार्य आहे असे रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी म्हटले आहे. पॉल हे ही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे. ४अमेरिकेतील २०१६ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हिलरी क्लिंटन यांनी उमेदवारी जाहीर केली असून, ती अत्यंत प्रबळ मानण्यात येत आहे; पण तरीही हिलरी यांना अध्यक्षपद मिळवताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.