न्यूयॉर्क : न्यूयॉर्क प्राथमिक निवडणुकीत विजय मिळवून डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन अनुक्रमे रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या आणखी निकट पोहोचले आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना उमेदवारीच्या स्पर्धेत मागे टाकले आहे. अलीकडील पराभवाच्या मालिकेनंतर मिळालेल्या या विजयाने हिलरी व ट्रम्प यांचा उमेदवारीवरील दावा त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे बर्नी सँडर्स आणि टेड क्रूज यांच्या तुलनेत अधिक भक्कम झाला आहे, तसेच या विजयाने प्रमुख उमेदवाराचा त्यांचा दर्जा आणखी बळकट झाला आहे. ट्रम्प यांच्या या विजयाचा अर्थ असा की, ते राज्यातील सर्व ९५ प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवू शकतात आणि जुलैैमध्ये कंटेस्टेड कन्व्हेन्शनच्या प्रक्रियेतून न जाताही पक्षाची उमेदवारी मिळवू शकतात. हिलरी यांचा हा विजय सँडर्स यांची लय कायमची बिघडवू शकतो. (वृत्तसंस्था)
हिलरी, ट्रॅम्प यांची बाजी
By admin | Published: April 21, 2016 3:29 AM