मॅक्सिको ड्रग्ज माफियांमध्ये झालेल्या गोळीबारात हिमाचल प्रदेशातील एक ट्रॅव्हल ब्लॉगरचा मृत्यू झाला आहे. स्वत:चा वाढदिवसा साजरा करण्यासाठी कॅलिफोर्नियायेथील मूळ भारतीय असलेली महिला मॅक्सिकोला गेली होती. याठिकाणी टुलमच्या एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात तिचा मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. महिला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील सैन जोस येथे राहायला आहे. या गोळीबारात महिलेसोबत एक जर्मन पर्यटक जेनिफर हेनजोल्डचाही मृत्यू झाला.
२९ वर्षीय अंजली रयोट(Anjali Ryot) ही ट्रॅव्हल ब्लॉगर होती. २२ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती मॅक्सिकोच्या टुलम येथे पोहचली होती. इन्स्टाग्राम बायोमध्ये हिमाचल प्रदेशची टॅव्हल ब्लॉगर असल्याचं तिने उल्लेख केला होता. अंजली जुलैमध्ये लिंक्डइनसोबत सिनिअर साइट रिलायबिलीटी इंजिनिअर म्हणून काम करत होती. त्याआधीही अंजली Yahoo मध्ये काम करत होती.
असॉल्ट रायफलने ४ लोकांनी गोळ्या चालवल्या
स्पॅनिश वृत्तपत्रानुसार, बुधवारी रात्री जवळपास १०.३० च्या सुमारास अंजली आणि ४ पर्यटक मालकेरिडा रेस्टॉरंटच्या टेरेसवर जेवण करत होते. तेव्हा असॉल्ट रायफल घेऊन ४ लोकांनी परिसरात गोळ्या चालवल्या. या गोळ्या त्याठिकाणी बसलेल्या २ पर्यटकांना लागल्या. ज्यात एक अंजली होती. तर दुसरा पर्यटक जर्मन जेनिफर हेनजोल्ड होता. फायरिंग या घटनेत जर्मनी आणि नेदरलँडचे ३ लोक जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले ड्रग्ज तस्करांच्या दोन गटात झालेल्या चकमकीत हा गोळीबार झाला.
३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मॅक्सिकोला गेली होती अंजली
मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात अंजलीच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला कळताच त्यांना धक्काच बसला. अंजलीचा भाऊ आशिषने टुलमच्या महापौरांशी संवाद साधत अंजलीचा मृतदेह लवकर ताब्यात देण्यासाठी विनंती केली. अंजली तिचा पती उत्कर्ष श्रीवास्तवसोबत २२ ऑक्टोबरला ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सैन जोसहून मॅस्किकोला गेली होती. उत्कर्षने घटनेबाबत शिकागोत राहणाऱ्या आशिषला माहिती दिली. आशिषने या दुर्घटनेची माहिती फोनवर अंजलीच्या वडिलांना कळवली. अंजलीच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.