कराची : पाकिस्तानातील कराची शहरातील डॉ. बिरबल जेनानी या हिंदू डॉक्टरची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली आहे. जेनानी हे कराची मेट्रोपोलिटन कॉर्पोरेशनच्या आरोग्य विभागात वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत होते. जेनानी हे गुलशन-ए-इक्बाल या भागातील आपल्या निवासस्थानी जात असताना त्यांच्यावर गाडीवर एका हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या या डॉक्टरचा गाडीवरील ताबा सुटला व ती एका भिंतीवर धडकली. यात त्यांचा मृत्यू झाला.
मुली पळविण्याचा प्रकार
पाकिस्तानातील हिंदू मुलींचे बळबजबरीने विवाह व धर्मांतर करण्यात येत आहेत. त्याविरोधात तेथील हिंदूंनी कराची येथील सिंध असेंब्लीच्या इमारतीसमोर गुरुवारी निदर्शने केली. पाकिस्तान दरावर इत्तेहाद या संस्थेने म्हटले आहे की, ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या हिंदूंच्या १२-१३ वर्षे वयाच्या मुलींना दिवसाढवळ्या पळविले जाते. त्यांचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांच्यापेक्षा खूप मोठ्या वयाच्या व्यक्तीशी विवाह लावला जातो. असे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत.