लंडन : कुटुंबाची असलेली संपत्ती एकाच भावाने आपल्या ताब्यात ठेवल्याने निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी हिंदुजा बंधू हे येथील हायकोर्टात गेले आहेत. ११.२ अब्ज डॉलर्सची ही मालमत्ता असून, त्याचा वाद सुरू आहे. सन २०१४मध्ये या मालमत्तेबाबतचे एक पत्र आहे. ही मालमत्ता कुटुंबाच्या मालकीची असली तरी ती एकाच भावाच्या ताब्यात आहे. हे पत्र रद्द करावे या मागणीसाठी हिंदुजा बंधुंपैकी सर्वात ज्येष्ठ श्रीचंद हिंदुजा (८४) न्यायालयात गेले असून, त्यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्व बंधुंनी आपापले प्रतिनिधी नेमले आहेत.हिंदुजा ग्रुप या उद्योग समूहाशी संबंधित असलेले श्रीचंद हिंदुजा, गोपीचंद हिंदुजा (८०), प्रकाश हिंदुजा (७५) आणि अशोक हिंदुजा (६९) हे चौघे बंधूू आहेत. यापैकी श्रीचंद आणि गोपीचंद हे दोघे सन १९७९पासून लंडनमध्ये राहात असून, त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. हिंदुजा कुटुंब हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत असलेल्या कुटुंबांपैकी एक आहे.
संपत्तीच्या वादातून हिंदुजा बंधू कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 2:41 AM